Airtel World Pass Plan : एअरटेलने लाँच केला नवीन स्पेशल प्लॅन; व्हॉईस कॉल, डेटा आणि बरंच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 01:03 PM2022-12-07T13:03:09+5:302022-12-07T13:03:40+5:30
Airtel World Pass Plan : एअरटेलचा नवीन आंतरराष्ट्रीय प्लॅन परवडणाऱ्या किमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन आहे.
नवी दिल्ली : एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन वर्ल्ड पास प्लॅन (World Pass Plan) लाँच केला आहे. हा एक मोबाईल प्लॅन आहे, ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय प्रवास करणारे युजर्स ते वापरू शकतात. हा प्लॅन 184 देशांमध्ये उपलब्ध आहे. हा प्लॅन अशा लोकांसाठी खूप उपयुक्त आहे, जे लोक वारंवार परदेशात जातात. एअरटेलचा नवीन आंतरराष्ट्रीय प्लॅन परवडणाऱ्या किमतीत वर्षभराची व्हॅलिडिटी असणारा प्लॅन आहे.
एअरटेल युजर्सना मेसेजिंग अॅप्स आणि आपत्कालीन वापरासाठी अनलिमिटेड डेटा ऑफर केला जात आहे. एअरटेल वर्ल्ड पासमध्ये व्हॉईस कॉलच्या किमतीही खूप कमी करण्यात आल्या आहेत. या सर्व योजना एअरटेल थँक्स अॅपद्वारे मॅनेज केल्या जाऊ शकतात. एअरटेल थँक्स अॅपमध्ये युजर्स बिलिंग रक्कम, रिअल-टाइम अपडेट पाहू शकतात आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त मिनिटे देखील अॅड केली जाऊ शकतात.
एअरटेल वर्ल्ड पासमधील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनची किंमत 649 रुपये आहे. हा प्लॅनमध्ये 500MB डेटा आणि भारतात कॉलिंगसाठी 100 मिनिटे मिळतात. या प्लॅनची व्हॅलिडिटी एक महिन्याची आहे. दुसरीकडे, सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 2,997 रुपये आहे आणि 2 GB मोबाइल डेटा, भारतात कॉल करण्यासाठी 100 मिनिटे आणि 365 दिवसांची व्हॅलिडिटी ऑफर देण्यात आली आहे.
जर तुम्ही अनेकदा परदेशात जात असाल आणि तुम्हाला अनलिमिडेट मोबाइल डेटा हवा असेल, तर एअरटेल वर्ल्ड पास पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. 649 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लॅनची व्हॅलिडिटी एका दिवसाची आहे आणि अनलिमिटेड मोबाइल डेटा मिळतो. 500MB डेटा वापरल्यानंतर स्पीड कमी होतो. या प्लॅनमध्ये भारतात कॉलिंगसाठी 100 एसएमएस देखील देण्यात आले आहेत.
व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन पाहिजे असणारे युजर्स 3,999 रुपयांचा प्लॅनची निवड करू शकतात. या प्लॅनमध्ये भारतात कॉल करण्यासाठी दररोज 100 कॉलिंग मिनिटे आणि 12 GB हाय-स्पीड डेटा दिला जातो. या प्लॅनची व्हॅलिडिटी एक महिन्याची आहे. एअरटेलच्या सर्वात महागड्या प्लॅनची किंमत 14,999 रुपये आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे.
वर्षभर व्हॅलिडिटी असलेल्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये भारतात कॉलिंगसाठी 3000 मिनिटे आणि 15 जीबी हाय-स्पीड इंटरनेट मिळतो. यानंतर स्पीड कमी होईल. एअरटेलच्या या सर्व प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांऐवजी, ग्राहकांना 24×7 कस्टमर सपोर्ट देखील मिळते. याशिवाय आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या त्वरित मदतीसाठी एक हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध आहे.