एअरटेलचा नवा प्लॅन, 349 रुपयांच्या रिचार्जवर स्पेशल ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2017 04:09 PM2017-10-27T16:09:03+5:302017-10-27T16:11:03+5:30
एअरटेल आणि व्होडाफोन या दोन्ही टेलिकॉम कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन्स आणत आहेत. आता एअरटेलने 100 टक्के कॅशबॅक ऑफर आणली आहे.
मुंबई - एअरटेल आणि व्होडाफोन या दोन्ही टेलिकॉम कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन्स आणत आहेत. आता एअरटेलने 100 टक्के कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर 349 रूपयांच्या प्लॅनवर लागू असून ठराविक कालावधीसाठी ही ऑफर असणार आहे. पण नेमकी कधीपर्यंत ही ऑफर असणार आहे हे अजून स्पष्ट नाही. यापूर्वी अशीच ऑफर जिओनेही आणली होती. 399 रूपयांच्या प्लॅनवर जिओची ऑफर होती.
ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठी असणार आहे. शिवाय कॅशबॅक देखील एकाच वेळी मिळणार नाही. कॅशबॅक तुम्हाला 7 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळेल. या ऑफरसाठी एअरटेल पेमेंट बॅंकेतून रिचार्ज करणं गरजेचं आहे.
केव्हा मिळणार कॅशबॅक -
पहिल्या महिन्यात रिफंड मिळणार नाही. दुस-या महिन्यापासून कॅशबॅक मिळायला सुरूवात होईल. दर महिन्याला 50 रूपये कॅशबॅक मिळेल म्हणजे 7 महिन्यांत 349 रूपये कॅशबॅक मिळेल. ही ऑफर माय एअरटेल अॅपवर उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांपर्यंत दरदिवशी 1GB 4G डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर लोकल आणि एसटीडी वॉइस कॉलिंग अनलिमिटेड असणार आहे.