Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का! लवकरच सर्व रिचार्ज प्लॅन महाग होणार, सुनील मित्तल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:51 PM2023-02-28T17:51:07+5:302023-02-28T17:51:56+5:30

Airtel Recharge Plans : एअरटेल युजर्ससाठी मोबाईल सेवा सध्याच्या तुलनेत आगामी काळात महाग होणार आहे.

Airtel Recharge Plans Price Hikes In 2023 Says Chairman Sunil Mittal | Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का! लवकरच सर्व रिचार्ज प्लॅन महाग होणार, सुनील मित्तल यांची माहिती

Airtel च्या ग्राहकांना मोठा धक्का! लवकरच सर्व रिचार्ज प्लॅन महाग होणार, सुनील मित्तल यांची माहिती

googlenewsNext

एअरटेलने (Airtel) अलीकडेच काही सर्कलमध्ये आपल्या किमान रिचार्ज प्लॅन (99 रुपये) बंद केला आहे. कंपनीच्या बेस प्लॅनची किंमत 155 रुपये झाली आहे. पुन्हा एकदा एअरटेल रिचार्ज प्लॅनच्या (Airtel Recharge Plan) किमतीत वाढ करण्यात आली आहे. एअरटेल यावर्षी आपल्या सर्व प्लॅनमध्ये मोबाईल सेवांचे दर वाढविण्याचा विचार करत आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये (MWC 2023) ही माहिती दिली. याचा अर्थ एअरटेल युजर्ससाठी मोबाईल सेवा सध्याच्या तुलनेत आगामी काळात महाग होणार आहे.

एअरटेलने गेल्या महिन्यात आपल्या किमान रिचार्जच्या सर्वात कमी किमतीच्या प्लॅनची ​​(28 दिवसांची मोबाइल फोन सेवा प्लॅन) किंमत जवळपास 57 टक्क्यांनी वाढवून 155 रुपये केली आहे. आठ सर्कलमध्ये ही वाढ करण्यात आली. वृत्तसंस्था पीटीआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सुनील मित्तल म्हणाले की, टेलिकॉम व्यवसायातील भांडवलावरील परतावा खूपच कमी आहे आणि या वर्षी प्लॅन अधिक महाग होण्याची शक्यता आहे. ही दरवाढ सर्वत्र असणार आहे, असेही सुनील मित्तल म्हणाले. दरम्यान, कंपनीचे ताळेबंद चांगल्या स्थितीत असताना दर वाढवण्याची गरज किती आहे, असा प्रश्न सुनील मित्तल यांना विचारण्यात आला होता. 

याचबरोबर, कंपनीने भरपूर भांडवल गुंतवले आहे. यामुळे ताळेबंद मजबूत होत आहे, परंतु उद्योगातील भांडवलावरील परतावा खूपच कमी आहे. हे बदलण्याची गरज असल्याचे सुनील मित्तल म्हणाले. तसेच, आम्ही किंमत थोडी वाढवण्याबद्दल बोलत आहोत, जी भारतात आवश्यक आहे. मला वाटते आहे की ती या वर्षी होईल, असे सुनील मित्तल यांनी सांगितले. याशिवाय, कमी उत्पन्न गटावर दरवाढीचा काय परिणाम होईल, याविषयी विचारले असता, सुनील मित्तल म्हणाले की मोबाइलच्या दरांमध्ये झालेली वाढ इतर गोष्टींवरील खर्चाच्या वाढीपेक्षा खूपच कमी आहे.

155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅन
एअरटेलच्या 155 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल देते. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 1 GB मोबाइल डेटा मिळतो. याशिवाय, ग्राहक या पॅकमध्ये 300 एसएमएसचाही लाभ घेऊ शकतात. तसेच, तुम्हाला लोकल एसएमएससाठी 1 रुपये आणि नॅशनल एसएमएससाठी 1.5 रुपये द्यावे लागतील.

Web Title: Airtel Recharge Plans Price Hikes In 2023 Says Chairman Sunil Mittal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.