Airtel चा करोडो यूजर्सना झटका; दोन रिचार्ज प्लॅन केले महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:03 PM2024-03-11T18:03:15+5:302024-03-11T18:03:38+5:30
Airtel Recharge Plan Price Hike : एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
Airtel Recharge Plan Price Hike : एअरटेलने (Airtel) आपल्या 30 कोटींहून अधिक टेलिकॉम यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. टेलिकॉम कंपनीने आपल्या दोन स्वस्त रिचार्ज प्लॅनच्या किंमती गुपचूप वाढवल्या आहेत. एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 40 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. एअरटेलचे हे दोन्ही प्रीपेड रिचार्ज प्लॅन आता नवीन किंमतीसह सूचीबद्ध आहेत.
कंपनीने नुकतेच मोबाईलचे दर वाढवण्याचे संकेत दिले होते. कंपनीचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल यांनी ARPU चे दर 200 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत वाढवण्याबाबत सांगितले होते. TelecomTalk च्या रिपोर्टनुसार, एअरटेलने 118 रुपये आणि 289 रुपयांचे स्वस्त रिचार्ज प्लॅन महाग केले आहेत. एअरटेलचा 118 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आता 129 रुपयांचा आहे. तसेच, 289 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत आता 329 रुपये झाली आहे. कंपनीने हे दोन्ही प्रीपेड प्लॅन एअरटेलच्या वेबसाइटवर तसेच Airtel Thanks ॲपवर सूचीबद्ध केले आहेत.
एअरटेल 129 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये 12GB डेटा मिळत आहे. हा एक डेटा पॅक आहे, ज्यामुळे युजर्स कोणत्याही सक्रिय प्लॅनसह हा रिचार्ज वापरू शकतील. यापूर्वी या प्लॅनची किंमत 118 रुपये होती म्हणजेच 1GB डेटासाठी 9.83 रुपये खर्च करावे लागत होते. आता यूजर्सला 1GB डेटासाठी 10.75 रुपये खर्च करावे लागतील.
एअरटेल 129 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनची वैधता 35 दिवसांची आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, 300 मोफत एसएमएस आणि एकूण 4GB डेटा येतो. याशिवाय, या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना Hello Tunes आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. याव्यतिरिक्त, अपोलो 24*7 सर्कलचे विनामूल्य सबस्क्रिप्शन देखील ऑफर केले जात आहे.