Airtel ने बंद केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन; नंबर सुरु ठेवणं होणार महाग 

By सिद्धेश जाधव | Published: July 5, 2021 03:12 PM2021-07-05T15:12:22+5:302021-07-05T15:23:47+5:30

Airtel recharge plans: Airtel चा 45 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत होती. हा प्लॅन एयरटेल नंबर सक्रिय ठेवण्याचा स्वस्त पर्याय होता.

airtel stops rs 49 and rs 45 recharge plans check details  | Airtel ने बंद केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन; नंबर सुरु ठेवणं होणार महाग 

Airtel ने बंद केले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन; नंबर सुरु ठेवणं होणार महाग 

Next

टेलिकॉम इंडस्ट्रीमधील चुरस 5G मुळे वाढत आहे. त्यामुळे जियो आणि एयरटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन सादर करत असतात. परंतु भारती एयरटेलने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने आपले दोन स्वस्त रिचार्ज प्लॅन्स बंद केले आहेत. एयरटेलने 45 रुपये आणि 49 रुपयांचा प्लॅन कोणतीही अधिकृत घोषणा न करता बंद केले आहेत. काही ग्राहकांसाठी हे प्लॅन्स उपलब्ध आहेत परंतु लवकरच कंपनी हे प्लॅन्स सर्व सर्कल्समध्ये बंद करू शकते.  

Airtel चा 45 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत होती. हा प्लॅन एयरटेल नंबर सक्रिय ठेवण्याचा स्वस्त पर्याय होता. तर 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 38.50 रुपयांचा टॉकटाइम, 100MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळत होती. कंपनीने काही सर्कल्समध्ये हे प्लॅन्स बंद केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपला नंबर सुरु ठेण्यासाठी 79 रुपयांच्या प्लॅनचा आधार घ्यावा लागेल. या प्लॅनमध्ये 64 रुपयांचा टॉकटाइम, 200MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता मिळते.  

Airtel Black  

एयरटेल ब्लॅकमध्ये ग्राहकांना एका बिलमध्ये 2 किंवा त्यापेक्षा अधिक एयरटेल सेवांचा वापर करता येईल. या सेवांमध्ये फायबर, डीटीएच आणि मोबाईलचा समावेश आहे. या सेवांसाठी एक खास कस्टमर केयर नंबर देण्यात येईल आणि रिलेशनशिप मॅनेजर नियुक्त केला जाईल.   

Airtel Black चे प्लॅन्स   

  • 2099 रुपयांमध्ये 3 मोबाईल कनेक्शन, 1 फायबर कनेक्शन आणि 1 डीटीएच कनेक्शन महिनाभर वापरता येईल. 
  • 1598 रुपयांमध्ये 2 मोबाईल कनेक्शन आणि 1 फायबर कनेक्शन महिनाभर वापरता येईल.   
  • 1349 रुपयांमध्ये 3 मोबाईल कनेक्शन आणि 1 डीटीएच कनेक्शन महिनाभर वापरता येईल.   
  • 998 रुपयांमध्ये 2 मोबाईल कनेक्शन आणि 1 डीटीएच कनेक्शन महिनाभर वापरता येईल.   

एयरटेल ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हे प्लॅन्स कस्टमाइज देखील करू शकतात. तुम्ही यात मिळणारा डेटा स्पीड, चॅनल्स आणि इतर अनेक गोष्टी कस्टमाइज करू शकता.   

Web Title: airtel stops rs 49 and rs 45 recharge plans check details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.