जिओला धोबीपछाड; अपलोड आणि डाऊनलोड स्पीडमध्ये 'या' कंपन्यांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 11:16 AM2019-10-23T11:16:36+5:302019-10-23T11:24:20+5:30

स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

Airtel tops in 4G download speed, Idea in uploading: Opensignal | जिओला धोबीपछाड; अपलोड आणि डाऊनलोड स्पीडमध्ये 'या' कंपन्यांनी मारली बाजी

जिओला धोबीपछाड; अपलोड आणि डाऊनलोड स्पीडमध्ये 'या' कंपन्यांनी मारली बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देजिओला धोबीपछाड देत एअरटेल आणि आयडियाने बाजी मारली आहे.ऑक्टोबर 2019 मध्ये एअरटेलचा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 9.6Mbps राहीला आहे.अपलोडिंग स्पीडमध्ये आयडियाने बाजी मारली आहे.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंटरनेट स्पीडनुसार युजर्स कंपनी निवडत असतात. दिवाळी आधी जिओने आपल्या युजर्सना फ्री कॉलिंग बंद करून दणका दिला आहे. त्यानंतर रिचार्ज, इंटरनेट, अपलोडिंग आणि डाऊनलोडिंग स्पीड याची जोरदार चर्चा रंगली आहे. यातच आता जिओला धोबीपछाड देत एअरटेल आणि आयडियाने बाजी मारली आहे.

ओपन सिग्नलने दिलेल्या रिपोर्टनुसार, एअरटेलने 4जी डाऊनलोडिंग स्पीडमध्ये जिओला मागे टाकले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये एअरटेलचा सरासरी डाऊनलोडिंग स्पीड 9.6Mbps राहीला आहे. तसेच व्होडाफोनने 7.9Mbps स्पीडसोबत दुसरा नंबरा लावला आहे. तर आयडिया तिसऱ्या नंबरवर असून 7.6Mbps चा स्पीड आहे. 

अपलोडिंग स्पीडमध्ये आयडियाने बाजी मारली आहे. 4जी नेटवर्क उपलब्ध करण्यात जिओच सर्वात पुढे आहे. जिओची 4जी उपलब्धता 97.8  टक्के आहे. तर एअरटेल 4जी उपलब्धता 89.2 टक्के, व्होडाफोन 76.9 टक्के आणि आयडिया 77.4 टक्के आहे. देशातील 42 शहरांमध्ये हा सर्व्हे करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. मात्र आता आणखी एका कंपनीने अनलिमिटेड कॉल फ्री देण्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे. व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे. 

Vodafone Idea Limited (VIL) ने गुरुवारी (10 ऑक्टोबर) IUC संबंधीत एक मोठी घोषणा केली आहे. युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस (IUC) लागणार नसल्याची माहिती व्होडाफोन-आयडियाने दिली आहे. कंपनीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल' असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे. व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 119 रुपयांचा आहे. 28 दिवस व्हॅलिडीटी, 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते. 

Web Title: Airtel tops in 4G download speed, Idea in uploading: Opensignal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.