एअरटेल, व्होडाफोन-आयडियाला 3050 कोटींचा दंड; रिलायन्स जिओला सेवा न दिल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2019 03:34 PM2019-06-17T15:34:13+5:302019-06-17T15:36:40+5:30
कमीशनने रिलायन्स जिओवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यास नकार दिला आहे.
नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (DoT) ने देशातील दोन प्रमुख टेलिकॉम कंपन्यांना जबर दंड ठोठावला आहे. एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जिओला कॉल कनेक्ट करण्यास टाळाटाळ चालविली होती. यामुळे या कंपन्यांना 3,050 कोटींचा दंड केला आहे.
टेलिकॉम कंपन्यांना सध्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. यामुळे या दंडाबाबत डिजिटल कम्युनिकेशन्स कमीशन (DCC) ने ट्रायकडे मत मागितले आहे.
कमीशनने रिलायन्स जिओवर कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यास नकार दिला आहे. जिओ चांगली सेवा देण्यास अपयशी ठरली आहे. DoT च्या अधिकाऱ्यानुसार DCC ने भारती एअरटेल आणि व्होडाफोनआयडिया यांनी रिलायन्स जिओला इंटरकनेक्शन न दिल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिलायन्स जिओने दाखल केलेल्या याचिकेमध्ये ऑक्टोबर 2016 मध्ये तीन कंपन्यांना प्राधिकरणाने 3050 कोटींचा दंड ठोठावला होता. ट्रायने एअरटेल आणि व्होडाफोनवर प्रत्येकी 1050 रुपयांचा दंड ठोठावला होता. तर आयडियावर 950 कोटी रुपयांचा दंड आकारला होता. आता व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्या आहेत.