Airtel चा 90 दिवसांचा प्लॅन; दररोज 1.5GB डेटासह मिळतात अनेक फायदे, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 05:12 PM2024-11-28T17:12:56+5:302024-11-28T17:13:07+5:30
Airtel वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते.
Airtel Recharge Plan: खाजगी टेलिकॉम कंपनी Airtel वेळोवेळी आपल्या यूजर्ससाठी नवनवीन प्लॅन आणत असते. आता कंपनीने आणखी एक नवीन प्लॅन आणला आहे. विशेष म्हणजे, जुलैमध्ये एअरटेलने आपल्या मोबाइल दरात वाढ केली होती, ज्यामुळे कंपनीचे लाखो युजर्स सोडून गेले. महागड्या प्लान्स झाल्यामुळे लाखो युजर्सनी आपले सिम बंद केले. पण, आता कंपनीने एक असा प्लान आणला आहे, ज्यात तुम्हाला अनेक बेनिफिट्स मिळतात.
एअरटेलचा 90 दिवसांचा प्लॅन
एअरटेलचा हा प्लॅन 929 रुपयांचा असून, याची वैधता 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, फ्री नॅशनल रोमिंग आणि दररोज 1.5 GB डेटाचा लाभ मिळतो. इतकंच नाही, तर या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 100 मोफत एसएमएस आणि फ्री हॅलो ट्यून्सचा लाभही दिला जातो.
या व्यतिरिक्त, या प्लॅनमध्ये युजर्सना Airtel Xstream ॲपचे सबस्क्रिप्शन मिळते, ज्यामध्ये SonyLIV, Lionsgate Play आणि Eros Now सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरील कंटेट विनामूल्य पाहता येतो.
जिओ आणि बीएसएनएलचे प्लॅन्स
Jio 899 रुपयांचा 90-दिवसांचा प्लॅन ऑफर करत आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 20GB डेटाचा लाभ मिळतो. याव्यतिरिक्त विनामूल्य राष्ट्रीय रोमिंग आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. मात्र, जिओच्या या प्लॅनमध्ये कोणतेही OTT सबस्क्रिप्शन नाही. दुसरीकडे, जर आपण BSNL बद्दल बोललो तर, कंपनीकडे सध्या 90 दिवसांच्या वैधतेसह कोणताही प्लॅन उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, एअरटेलचा हा 90 दिवसांचा प्लॅन युजर्ससाठी एक चांगला पर्याय बनू शकतो, विशेषत: ज्यांना अमर्यादित कॉलिंग आणि OTT प्लॅटफॉर्मचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी.