एअरटेलची रिलायन्स जिओला तगडी टक्कर, 2500 रूपयात आणणार 4 जी स्मार्टफोन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 11:36 AM2017-09-12T11:36:19+5:302017-09-12T11:38:16+5:30

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल रिलायन्स जिओला तगडी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच ते 2500 ते 2700 रूपयांचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहेत.

Airtel's Reliance Gear to hit a tumble, the Rs 4,500 smartphone will fetch Rs 2500 | एअरटेलची रिलायन्स जिओला तगडी टक्कर, 2500 रूपयात आणणार 4 जी स्मार्टफोन

एअरटेलची रिलायन्स जिओला तगडी टक्कर, 2500 रूपयात आणणार 4 जी स्मार्टफोन

ठळक मुद्देलवकरच एअरटेल 2500 ते 2700 रूपयांचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी ग्राहकांना जर थोडे जास्त पैसे खर्च करून स्मार्टफोन मिळत असेल तर ते तेवढा खर्च करतील असा एअरटेलचा विचारदिवाळीच्या आधी हा फोन मार्केटमध्ये येण्याची शक्यता

नवी दिल्ली, दि. 12 - देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी  भारती एअरटेल रिलायन्स जिओला तगडी टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच ते 2500 ते 2700 रूपयांचा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. याद्वारे रिलायन्स जिओच्या इफेक्टिव्ह किंमत शून्य असलेल्या फोनला टक्कर देण्याचा एअरटेलचा प्रयत्न आहे. जिओच्या या फोनची बुकींग नुकतीच सुरू झाली आहे. 

मात्र, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिओच्या विरूद्ध एअरटेलचा हा फोन स्मार्टफोन असणार आहे. कारण ग्राहकांना जर थोडे जास्त पैसे खर्च करून स्मार्टफोन मिळत असेल तर ते तेवढा खर्च करतील असा एअरटेलचा विचार आहे. दिवाळीच्या आधी हा फोन मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे. यामध्ये 4 जी कनेक्शनशिवाय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डेटा आणि वॉइस प्लॅनदेखील असणार आहे.  

या ड्युअल सिम 4 जी स्मार्टफोनमध्ये 4 इंचाचा डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा VolTe कॉलिंग  आणि चांगल्या क्षमतेची बॅटरी असणार आहे. यामध्ये एक जीबी रॅम असेल. मात्र, एअरटेलने याबाबत अजूनपर्यंत अधिकृत माहिती दिलेली नाही.  

एअरटेलनं व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्यूशन (VoLTE) ही सेवाही लाँच केली आहे. मुंबईतून या सेवेला सुरुवात करण्यात आली. VoLTE सेवा देणारी एअरटेल भारतातील दुसरी दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलचे 26 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. जिओने कंपन्यांसमोर तगडं आव्हान उभं केल्यानंतर ग्राहकांना VoLTE सेवा देण्यासाठी इतर कंपन्यांही सरसावल्या आहेत.

VoLTE सेवा सध्या केवळ मुंबईतील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही सेवा देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. या सेवेसाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही, असं एअरटेलने म्हटलं आहे.
जिओची VoLTE सेवा केवळ 4G नेटवर्कवरच उपलब्ध आहे. मात्र एअरटेलचे 2G आणि 3G ग्राहकही डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करु शकतात. यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीची अडचण येणार नाही. ही टेक्निक केवळ एअरटेलकडेच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
जिओ आणि एअरटेलनंतर व्होडाफोनही लवकरच VoLTE सेवा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
काय आहे VoLTE सेवा?
VoLTE ही अशी सुविधा आहे, ज्यामुळे डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करता येते. म्हणजेच तुमच्या डेटा पॅकमध्येच तुम्ही कॉलिंगचाही लाभ घेऊ शकता. VoLTE सेवेत ग्राहकांना व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळते. 
 

Web Title: Airtel's Reliance Gear to hit a tumble, the Rs 4,500 smartphone will fetch Rs 2500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.