लहान मुलांच्या हातात फोन, टॅब देत आहात ?... तर मग वेळीच सावध व्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2018 09:15 AM2018-02-27T09:15:45+5:302018-02-27T09:15:45+5:30
मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही.
मुंबई - मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल, टॅब आणि लॅपटॉप कौतुकानं देणं हा काही स्टेटस सिम्बॉल नाही. ‘आम्ही किती आधुनिक’ म्हणून मिरवण्याचीही गोष्ट नाही. उलट यामुळं तुमच्या मुलाला याचा फटका बसू शकतो. इंग्लंडमधील डॉक्टरांनी नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, जी मुलं फोन किंवा टॅबचा वापर करतात त्यांच्या बोटाच्या मांसपेशींचा विकास व्यवस्थित होत नाही. त्यामुळं त्यांना पेन अथवा पेन्सिल पकडताना त्रास होऊ शकतो. ब्रिटनमधील हॉर्ट ऑफ इंग्लंड फाउंडेशन एनएचएस ट्रस्टमधील लहान मुलांचा थेरपिस्ट सैली म्हणतात की, सध्या शाळेत शिकत असलेल्या लहान मुलांच्या हाताचे स्नायू तितकेसे मजबूजत नाही जे दहा वर्षांपूर्वींच्या मुलांमध्ये पहायला मिळायचे. पेन, पेन्सिल पकडण्यासाठी आणि लिहण्यासाठी आपल्या बोटाच्या मासपेशीवर आपलं नियंत्रण असावं लागते.
या कौशल्याचा विकास करण्यासाठी मुलांना परिश्रम करावे लागतात. लहान वयामध्ये बोटाचा विकास होणं गरजेच आहे. त्यासाठी तो व्यायाम व्हावा. मोबाइल आणि टॅबच्या वापरामुळं मुलांचे पेन, पेन्सिल वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे. त्याचप्रमाणे ते मैदानी खेळही विसरले आहेत. गार्डियनच्या वृत्तानुसार, मुलांची मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्यामुळं मासपेक्षीचा विकास चांगल्या प्रकारे होतील. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल आणि टॅब देण्याऐवजी त्यांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावं.
लहान मुलांचा विकास कसा होतो यावर अभ्यास करणाऱ्या लंडनमधील एका संस्थेच्या प्रूंटी म्हणाल्या की, तंत्रज्ञानाचा आधिकाधिक वापर करणाऱ्या मुलांचे लेखन कौशल्य विकसित होण्यासाठी वेळ लागतो. इतर विद्यार्थांच्या तुलनेत त्यांना लिहताना त्रास होण्याचे प्रमाण आधिक आहे. अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात स्मार्ट फोन्स, टॅब वापरामुळे अनेकांची स्मृती कमी होत असल्याचे आढळून आले आहे. स्मार्ट फोन्स आणि इंटरनेटमुळे मुलांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता कमी होत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
अनेक जण लहान मुलांना विरंगुळा म्हणून स्वत:चे स्मार्ट फोन्स खेळण्यासाठी देतात किंवा शाळेतून घरी येताना मुले एकटीच येतात. त्यांना काही निरोप द्यायचा असल्यास पटकन संपर्क साधता यावा, म्हणून पालकच लहान मुलांना स्मार्ट फोन्स देतात. पण, त्याचा परिणाम त्यांच्या स्मरणशक्तीवर आणि एकाग्रतेवर होताना दिसत आहे. सतत स्मार्ट फोनचा वापर केल्यामुळे नैसर्गिकरीत्या मुलांची इतर गोष्टींत एकाग्रता कमी व्हायला लागते. या मुलांना स्मार्ट फोन दिला नाही, तर ते चिडचिडेपणा करायला लागतात, असेही काही तज्ञांचे मत आहे.