धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:43 PM2021-02-27T16:43:04+5:302021-02-27T16:43:25+5:30

Cyber Crime : सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे.

alert cyber criminals has new way to steal your money know how government warns | धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट

धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट

Next

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच फसवणूकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. देशातील बँकिंग फसवणूकीच्या (Banking Fraud) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच एक मोठं कारण म्हणजे यादरम्यान इंटरनेटचा वाढता वापर. याचाच फायदा सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी करुन घेत आहेत. गृहमंत्रालयानेच आता याबाबतची माहिती दिली आहे. सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे.

मंत्रालयाने लोकांना इशारा दिला आहे, की कोणत्याही प्रकारची चूक करू नका. तसेच तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची प्रकरणं समोर येत आहेत. याच कारणामुळे सरकार आणि बँकांनी लोकांना याबद्दल जागरुक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र तरीही हे गुन्हे बंद झालेले नाहीत. सायबर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करत आहे. नवनवीन मार्गांनी लोकांना आपल्या जाण्यात ओढत आहेत. लिंकवर क्लिक केल्यास हॅकर तुमची संपूर्ण माहिती चोरू शकतात. त्यामुळे अशा लिंकवर कधीच क्लिक करू नका. 

लोक काहीही विचार न करता या लिंकवर क्लिक करतात आणि त्यांची संपूर्ण माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते. गृहमंत्रालयाद्वारे सायबर दोस्त या हँडलवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये या मेसेजचं स्वरुपही दाखवलं गेलं आहे. तुम्हाला असा मेसेज येत असेल तर लगेचच सायबर क्राईम पोलिसांकडे याबद्दलची तक्रार करा. सोबतच मेसेजमध्ये दिल्या गेलेल्या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका. सरकारकडून वेळोवेळी फेक मेसजबद्दलचा अलर्ट जारी केला जातो. तसेच या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कधीच अनोळखी नंबरवरुन आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि हे मेसेज फॉरवर्डही करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...नाहीतर तुमचं WhatsApp अकाऊंट होईल हॅक, "या" सेटिंग्ज लगेचच बदला अन् वेळीच घ्या खबरदारी

 व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित नवनवीन माहिती ही समोर येत आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे. हॅकर्सनी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात. त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप रन करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे. यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतं.

Web Title: alert cyber criminals has new way to steal your money know how government warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.