Alphabet Layoffs: Meta-Amazonनंतर आता 'Alphabet'मधून 10,000 कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 07:03 PM2022-11-22T19:03:12+5:302022-11-22T19:04:58+5:30
Google Layoff Plan: गूगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.
Alphabet Layoffs: गेल्या काही दिवसांपासून विविध टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढत आहेत. यातच आता गूगल (Google) ची पॅरेंट कंपनी अल्फाबेट (Alphabet) देखील आपल्या 10,000 कर्मचाऱ्यांना नारळ देणार आहे. मेटा (Meta), अमॅझॉन (Amazon), ट्विटर ( Twiiter) आणि सेल्सफोर्स ( Salesforce) सारख्या मोठ्या कंपन्यांनी आधीच आपल्या शेकडो-हजारो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी 6 टक्के कर्मचाऱ्यांना काढत आहे. एका रिपोर्टनुसार, गूगल न्यू रॅकिंग आणि परफॉर्रमेंस इप्रूव्हमेंट प्लॅन (New Ranking And Improvement Plan) अंतर्गत खराब कामगिरी करणाऱ्या 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. नवीन परफॉर्रमेंस मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे पुढील वर्षाच्या सुरुवातीला हजारो कर्मचाऱ्यांची कपात होईल. मॅनेजर्स या कर्मचाऱ्यांची रेटिंग करणार आहे.
या नवीन सिस्टीमद्वारे अशा 6 टक्के(10,000) कर्मचाऱ्यांना वेगळ्या कॅटेगरीमध्ये ठेवले जाणार, ज्यांचे प्रदर्शन अतिशय खराब असेल. अल्फाबेटमध्ये अंदाजे 1,87,000 कर्मचारी काम करतात. अमेरिकन सिक्योरिटिज अँड एक्सचेंज कमीशन (SEC) फायलिंगनुसार, अल्फाबेटमध्ये काम करणार्या कर्मचाऱ्यांचे सरासरी वेतन 2,95,884 डॉलर आहे.
अमेरिकन अर्थव्यवस्थे (United States Economy) वरील संकट आणि मंदीच्या संशयामुळे (Recession Fear) 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत अल्फाबेटची कमाई 27 टक्क्यांनी कमी होऊन 13.9 अब्ज डॉलर्सवर आली आहे. पण, रेव्हेन्यू 6 टक्क्यांनी वाढून 69.1 अब्ज डॉलर्स झाला आहे. नुकतेच अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई (Sunder Pichai) ने अल्फाबेटला आणखी सक्षम बनवण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. सध्या गूगलनेही नवीन कर्मचारी भरती थांबवली आहे.