सिंगल चार्जवर 10 दिवस चालणारे दमदार Earbuds; इतक्या स्वस्तात दमदार साउंड आणि फास्ट चार्जिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 18:14 IST2022-03-08T18:14:31+5:302022-03-08T18:14:39+5:30
AMANI ब्रँडनं भारतात आपले नवीन TWS Earbuds सादर केले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 10 दिवसांचा स्टँडबाय टाइम देतात.

सिंगल चार्जवर 10 दिवस चालणारे दमदार Earbuds; इतक्या स्वस्तात दमदार साउंड आणि फास्ट चार्जिंग
AMANI ब्रँडनं आपले नवीन बजेट फ्रेंडली TWS Earbuds सादर केले आहेत. कंपनीनं सादर केलेल्या AMANI ASP i12 TWS इयरबड्समध्ये Bluetooth 5.1, 8 तासांचा टॉकटाईम आणि IPX6 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. AMANI ASP i12 TWS चा फक्त एकाच व्हाईट कलर व्हेरिएंट बाजारात आला आहे. कंपनीनं याची किंमत 1,799 रुपये ठेवली आहे. हे इयरबड्स अधिकृत वेबसाईटसह आणि डीलर्सकडून विकत घेता येतील.
AMANI ASP i12 TWS चे स्पेसिफिकेशन्स
हे इयरबड्स पोर्टेबल डिजाईनसह सादर करण्यात आले आहेत. यातील ब्लूटूथ 5.1 मुळे 10 मीटर पर्यंतची कनेक्टिव्हिटी मिळते. चार्जिंग केस ओपन होताच हे इयरबड्स तुमच्या डिवाइसशी कनेक्ट होतील. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 8 तासांचा टॉकटाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच हे बड्स 260 तासांचा स्टँडबाय देऊ शकतात. इयरबड्समध्ये 50mAh ची बॅटरी मिळते तर केसमध्ये 400mAh ची इनबिल्ट बॅटरी आहे.
AMANI i12 TWS इयरबड्स डायनॅमिक साउंड, बेस आणि क्रिस्प म्यूजिक क्वालिटी देणाऱ्या ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. यात म्युजिक प्लेबॅक, कॉल कंट्रोल करण्यासाठी कंपनीनं टच कंट्रोल दिले आहेत. तसेच या इयरबड्समध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. यातील IPX6 रेटिंग या बड्सना पाण्यापासून वाचवते.
हे देखील वाचा:
- Free Fire MAX मध्ये असे मोफत मिळवा Diamond Royale Voucher; आता अनेक रिवॉर्ड्सही फ्री
- फ्लिपकार्टनं केली कमाल; फक्त 6 हजार रुपयांमध्ये Samsung ची शानदार Smart TV
- रेडमी-रियलमीची झोप उडणार; Samsung नं सादर केला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन, पहिल्याच सेलमध्ये मोठा डिस्काउंट