Alexa पासून मुलांना सांभाळा! असे चॅलेंज दिले की मुलाला विजेचा शॉक बसणार होता, पण... 

By सिद्धेश जाधव | Published: December 30, 2021 07:58 PM2021-12-30T19:58:54+5:302021-12-30T20:00:54+5:30

Amazon Alexa Challenge: आता अ‍ॅलेक्साची दुसरी बाजू समोर आली आहे. अलीकडेच घडलेल्या एका घटनेत अ‍ॅलेक्सानं एका लहान मुलाचा जीव धोक्यात घातला होता.  

amazon alexa challenged a 10 year old child to put a penny on a live electrical connection  | Alexa पासून मुलांना सांभाळा! असे चॅलेंज दिले की मुलाला विजेचा शॉक बसणार होता, पण... 

Alexa पासून मुलांना सांभाळा! असे चॅलेंज दिले की मुलाला विजेचा शॉक बसणार होता, पण... 

Next

व्हर्च्युअल व्हॉइस एआय असिस्टंट Amazon Alexa चा प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. फक्त बोलून अलार्म, माहिती मिळवणे, गाणी लावणे इत्यादी कामं करण्यासाठी अ‍ॅलेक्साचा वापर केला जातो. परंतु आता अ‍ॅलेक्साची दुसरी बाजू समोर आली आहे. अलीकडेच घडलेल्या एका घटनेत अ‍ॅलेक्सानं एका लहान मुलाचा जीव धोक्यात घातला होता.  

Amazon Alexa Challenge 

क्रिस्टिन लिवडाहल या ट्विटर युजरनं ट्विटरवर ही धक्कादायक घटना शेयर केली आहे. त्यांच्या 10 वर्षाच्या मुलानं अ‍ॅलेक्सा इनेबल्ड इकोकडे एका चॅलेंजची मागणी केली. त्या प्रश्नाला उत्तर देताना अ‍ॅलेक्सानं म्हटलं, ‘चॅलेंज खूप सोपं आहे’. त्यानंतर लहान मुलाला फोन चार्जर पॉवर आउटलेटमध्ये अर्धा प्लग करण्यासाठी सांगितलं आणि बाहेर राहिलेल्या खुल्या पिन्सना हात लावण्यास सांगितलं. 

हे चॅलेंज स्वीकारल्यास विजेचा झटका बसून जीव जाण्याचा संभव होता. क्रिस्टिन लिवडाहल यांनी ट्विटरवर याचा स्क्रीनशॉट देखील शेयर केला आहे. विशेष म्हणजे हे एक टिकटॉकवरील जुनं वायरल ‘पेनी’ चॅलेंज आहे. परंतु अ‍ॅलेक्सानं हे चॅलेंज कसं दिल हे अजून समजलं नाही.  

अ‍ॅमेझॉनची कारवाई 

अ‍ॅमेझॉननं हा अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सामधील बग असल्याचं म्हटलं आहे. तसेच हे फिचर आता बंद करण्यात आलं आहे. तक्रार करणाऱ्या क्रिस्टिन लिवडाहल यांनी देखील हे फंक्शन बंद झाल्याची माहिती दिली आहे. परंतु इंटरनेटवरील अनवेरिफाइड कंटेंट शेयर करणं अ‍ॅलेक्सा थांबवणार कि नाही हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे, जो खरा मुद्दा आहे. कंपनीनं एक चॅलेंज बंद केलं असलं तर अजून कित्येक प्रश्न आहेत ज्यांची चुकीची किंवा धोकादायक माहिती अ‍ॅलेक्सा देऊ शकते.  

हे देखील वाचा: 

Jio युजर्सनी इकडे लक्ष द्या! या 7 चुका तुम्हाला करू शकतात 'कंगाल', आताही वेळ आहे

फक्त 7,499 रुपयांमध्ये आला 5000mAh Battery असलेला शानदार स्मार्टफोन; Redmi ला टाकणार मागे?

Web Title: amazon alexa challenged a 10 year old child to put a penny on a live electrical connection 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.