पुन्हा मिळणार नाही संधी! Samsung च्या जबरदस्त 5G Smartphone बंपर डिस्काउंट; फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: February 26, 2022 07:28 PM2022-02-26T19:28:32+5:302022-02-26T19:29:48+5:30
Amazon Fab Phone Fest: अॅमेझॉनवर सुरु असलेल्या फॅब फोन्स फेस्ट सेलमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy S20 FE 5G डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.
Amazon Fab Phone Fest: 25 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल सुरु आहे. नावाप्रमाणे यात अनेक फोन्सवर डिल्स आणि ऑफर्सचा वर्षाव सुरु आहे. तुम्ही देखील तुमचा फोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर या सेलमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या सेलमध्ये Samsung Galaxy S20 FE 5G हा कंपनीचा फ्लॅगशिप फोन मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.
Samsung Galaxy S20 FE 5G ची किंमत आणि ऑफर्स
Samsung Galaxy S20 FE 5G ची मूळ किंमत 74,999 रुपये आहे. परंतु अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन 36,990 रुपये देऊन विकत घेता येईल. सोबत 1,200 रुपयांचा कुपन डिस्काउंट, आणि एचडीएफसी बँकेच्या कार्ड्सवर 1000 रुपयांची सूट देखील मिळत आहे. त्यामुळे हा फोन तुम्ही 34,790 रुपयांमध्ये घरी आणू शकता. जर तुम्हाला आणखीन बचत करायची असेल तर 14,900 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. हा डिस्काउंट तुम्ही एक्सचेंज करत असलेल्या स्मार्टफोनच्या कंडिशन, ब्रँड, मॉडेल इत्यादी घटकांवर अवलंबून आहे.
Samsung Galaxy S20 FE 5G चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन Android 10 वर आधारित OneUI वर चालतो. Samsung Galaxy S20 FE 5G स्मार्टफोन IP68 रेटिंग सह येतो. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस मिळते. सेल्फीसाठी हा फोन 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी मिळते जी 25W फास्ट चार्जला सपोर्ट करते.
Samsung Galaxy S20 FE 5G मध्ये 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्लेसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080×2400 पिक्सल आणि रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनमध्ये सेल्फीसाठी पंच होल कटआउट आहे. तसेच प्रोसेसिंगसाठी सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर देण्यात आला आहे जो 8GB रॅमसह येतो. या स्मार्टफोनची 128GB इंटरनल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: 39 हजारांचा डिस्काउंट! Windows 11 असलेल्या Lenovo चा लॅपटॉप स्वस्तात
- पंखा बंद करण्यासाठी कोण उठणार? यावरून भांडू नका; स्वस्तात ‘हे’ रिमोट असलेले Ceiling Fans घ्या
- खुशखबर! ‘या’ तारखेपर्यंत भारतात 5G सेवा होऊ शकते सुरु; पंतप्रधान कार्यालयानं व्यक्त केली इच्छा