लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 13:30 IST2022-02-26T13:24:58+5:302022-02-26T13:30:38+5:30
Amazon Fab Tv Fest: Amazon वर 25 फेब्रुवारीपासून Fab TV Fest सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही Samsung चा 32-इंचाची Smart TV को 8,700 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

लैभारी! 9 हजार रुपयांमध्ये मिळवा Samsung चा दमदार Smart TV; Amazon वर धमाकेदार सेल सुरु
Amazon Fab Tv Fest: Amazon नं आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर Fab TV Fest सेलची सुरुवात केली आहे. 25 फेब्रुवारीला सुरु झालेला हा सेल 28 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. नावावरून तुम्हाला समजलं असेल कि, या सेलमध्ये टीव्ही स्वस्तात विकत घेता येतील. या लेखात आपण एका ऑफरची माहिती घेणार आहोत, जी तुम्हाला 19,900 रुपयांचा विकला जाणारा Samsung ची Smart TV अगदी स्वस्तात म्हणजे 8,700 रुपयांमध्ये मिळवून देईल.
किंमत आणि डिस्काउंट
Samsung 32 inch Wondertainment Series HD Ready LED Smart TV ची किंमत 19,900 रुपये आहे. परंतु अॅमेझॉनच्या फॅब टीव्ही फेस्टमध्ये हा मॉडेल 16,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. यावर HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड धारकांना 1,500 रुपये पर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे हिची किंमत 15,499 रुपये होईल. तसेच एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही जुनी टीव्ही देऊन तुम्ही 6,799 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. हा डिस्काउंट जुन्या टीव्हीची कंडिशन, ब्रँड अशा अनेक गोष्टींवर अवलंबुन आहे. जर संपूर्ण लाभ मिळाला तर सॅमसंगची नवी स्मार्ट टीव्ही तुम्ही 8,700 रुपयांमध्ये घरी आणू शकता.
स्पेक्स आणि फीचर्स
Samsung 32 inch Wondertainment Series HD Ready LED Smart TV च्या नावातच अनेक स्पेक्स आहेत. ही एक 32-इंचाची एलईडी टीव्ही आहे. जी एचडी रेडी रिजोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसह विकत घेता येईल. यात सॅमसंगचा टायजेन ओएस आहे. जो नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ आणि यूट्यूब सारख्या अॅप्सना सपोर्ट करतो. दमदार ऑडिओसाठी यात 20W चे स्पिकर्स देण्यात आले आहेत. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी दोन एचडीएमआय पोर्ट्स, एक यूएसबी पोर्ट आणि वायफाय, असे ऑप्शन मिळतात.
हे देखील वाचा:
- अँड्रॉइड युजर्सना Apple कडे वळवण्याची तयारी; सर्वात स्वस्त 5G iPhone येतोय ‘या’ दिवशी, किंमतही समजली
- Vivo च्या ‘या’ फोनमध्ये 7 इंचाची मोठी स्क्रीन; कंपनी करतेय सर्वात पावरफुल स्मार्टफोनवर काम
- ‘या’ दिवशी होईल बहुप्रतीक्षित Asus 8Z ची भारतात एंट्री; छोट्या आकारात मोठ्या धमाक्याची तयारी