जुन्या टीव्हीला स्मार्टटीव्ही बनवणारी Amazon Fire TV Stick 4K Max खरेदीसाठी उपलब्ध
By सिद्धेश जाधव | Published: October 7, 2021 04:50 PM2021-10-07T16:50:44+5:302021-10-07T16:51:33+5:30
Fire TV Stick 4K Max price in India: Fire TV Stick 4K Max आता Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे. या टीव्ही स्टिकची किंमत 6,499 रुपये ठेवण्यात आली आहे.
अॅमेझॉनने नवीन Fire TV Stick गेल्या महिन्यात भारतात सादर केली होती. या टीव्ही स्टिकच्या मदतीने जुन्या LED किंवा LCD टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येते. यासाठी फक्त ही फायर टीव्ही स्टिक एचडीएमआय पोर्टच्या माध्यमातून जुन्या टीव्हीला जोडावी लागते. त्यानंतर तुम्ही स्मार्ट टीव्ही प्रमाणे जुनी टीव्ही देखील वापरू शकाल. सप्टेंबरमध्ये सादर झालेली Fire TV Stick 4K Max आता खरेदीसाठी उपलब्ध झाली आहे.
Fire TV Stick 4K Max ची किंमत
अॅमेझॉनने भारतात Fire TV Stick 4K Max ची किंमत 6,499 रुपये ठेवली आहे. सध्या ही स्टिक अॅमेझॉनवर वरून फेस्टिव्हल सेलमधून विकत घेता येईल.
Fire TV Stick 4K Max चे स्पेसिफिकेशन्स
Fire TV Stick 4K Max मध्ये अॅमेझॉनने 1.8GHz क्लॉक स्पीड असलेल्या MediaTek MT8696 प्रोसेसरचा वापर केला आहे, तसेच यात 2GB RAM देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या स्टिकमध्ये Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.0 मिळते. तसेच यात HDR10 आणि HDR10+ सपोर्ट देण्यात आला आहे. ही स्टिक डॉल्बी अॅटमॉस आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करते.
ही फायर टीव्ही स्टिक नियंत्रित करण्यासाठी रिमोटमध्ये व्हॉइस अस्टिटंट Alexa चा सपोर्ट देण्यात आला आहे. हा रिमोट बिल्ट-इन Amazon Prime Video, Netflix सारख्या बटन्ससह येतो. तसेच नव्या फायर टीव्ही स्टिकमध्ये लाईव्ह व्यू आणि पिक्चर-इन-पिक्चर फीड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. अॅमेझॉनच्या मते जुन्या फायर टीव्ही स्टिकच्या तुलनेत ही Fire TV Stick 4K Max 40 टक्के जास्त वेगवान आहे