आता 1 रुपयात सोने खरेदी करू शकता, Amazon Pay चे नवे फीचर लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 01:40 PM2020-08-21T13:40:59+5:302020-08-21T15:28:01+5:30
हे फीचर Paytm, PhonePe, Google Pay, MobiKwik सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : ई-कॉमर्समधील कंपनी अॅमेझॉन इंडिया (Amazon India)ची पेमेंट सर्व्हिस अॅमेझॉन पे (Amazon Pay)ने ग्राहकांसाठी एक उत्तम फीचर आणले आहे. या फिचरला 'गोल्ड वॉल्ट' (Gold Vault) असे नाव देण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना डिजिटल सोन्याची खरेदी करण्याची ऑफर देण्यात आली आहे.
अॅमेझॉनच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, ग्राहक या फीचरमधून १ रुपयाचे सुद्धा सोने देखील खरेदी करू शकतात. अॅमेझॉन कंपनीने यासाठी सेफगोल्डसोबत भागीदारी केली आहे. सेफगोल्ड हे डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे रिटेल ब्रँड आहे, जे २४ कॅरट ९९५ शुद्धतेचे सोने देते. 'गोल्ड वॉल्ट' या फीचरला लाँच करुन अॅमेझॉनने मोठ्या संख्येने मध्यम व तरुण ग्राहकांना व्यवस्थापित केले आहे. हे फीचर Paytm, PhonePe, Google Pay, MobiKwik सारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्याची शक्यता आहे.
अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, या फीचरच्या माध्यमातून ग्राहक डिजिटल रूपात सोन्यात १ रूपयाची गुंतवणूक करु शकतात. तसेच, जर सोने त्यांना हवे असल्यास कोणत्याही केवायसीशिवाय २ ग्रॅम पर्यंत खरेदी करू शकतात. मात्र, सुरुवातीला गोल्ड वॉल्टच्या माध्यमातून आपल्याला कमीतकमी ५ रुपयांच्या रकमेचे डिजिटल सोने खरेदी करावे लागते.
दरम्यान, डिजिटल सोन्याच्या खरेदीची ही कल्पना नवीन नाही. यापूर्वी PhonePe, Paytm, MobiKwik आणि Google Pay सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह इतर अनेक कंपन्यांनी असे फीचर लाँच केले आहे आणि त्या आधीपासून डिजिटल सोन्याची विक्री करीत आहेत.
Google Pay ने गेल्या वर्षी एप्रिलमध्येच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याची ऑफर आणली होती. त्याच वेळी, Paytm आणि PhonePe यांनाही २०१७ मध्ये आपल्या प्लॅटफॉर्मवर डिजिटल सोन्याची ऑफर देण्यास सुरुवात केली, तर गुरुग्रामच्या मोबिक्विकने २०१८ मध्ये ही ऑफर लाँच केली होती.
याशिवाय, पेटीएम ऑनलाइन वॉलेट कंपनी आपल्या युजर्संना पेटीएम गोल्डच्या रूपात कोणत्याही व्यवहारावर कॅशबॅक ऑफर करते. पेटीएमने ऑक्टोबर २०१६ मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आपले डिजिटल गोल्ड लाँच केले होते. इतकेच नाही तर पेटीएम सारख्या काही कंपन्या नाणे स्वरूपात सोन्याची डोरस्टेप डिलिव्हरी देखील देतात. अगदी चीनी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शाओमीने एप्रिलमध्ये त्याच्या पेमेंट सर्व्हिस MiPay वर डिजिटल सोन्याची ऑफर दिली आहे.
आणखी बातम्या...
१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार
आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका
मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!
जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार
शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन