'पावर बँक'वर बंपर डिस्काऊंट! 40000mAh क्षमतेची बॅटरी, मोबाइलसारखं डिझाइन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 16:00 IST2022-06-27T16:00:00+5:302022-06-27T16:00:33+5:30
Power Bank Discount: स्मार्टफोनसाठी बॅटकी बॅकअप एक मोठी समस्या ठरते. भले बाजारात 5000mAh आणि 6000mAh पावर क्षमतेचे स्मार्टफोन उपलब्ध

'पावर बँक'वर बंपर डिस्काऊंट! 40000mAh क्षमतेची बॅटरी, मोबाइलसारखं डिझाइन
Power Bank Discount: स्मार्टफोनसाठी बॅटकी बॅकअप एक मोठी समस्या ठरते. भले बाजारात 5000mAh आणि 6000mAh पावर क्षमतेचे स्मार्टफोन उपलब्ध असले तरी पावर बॅकअपच्यावेळी फिचर्स फोन्स मागे पडतात. अशात पावर बँक खूप उपयोगी ठरतात. त्या पोर्टेबल चार्जर म्हणून काम करतात.
प्रवासात किंवा इतर ठिकाणी आपला फोन चार्ज करण्यासाठी पावर बँक खूप महत्वाच्या ठरतात. गेल्या काही वर्षात पावर बँकमध्ये वेगवेगळे बदल झालेले पाहायला मिळाले आहेत. आता पावर बँकमध्ये LED लाइट्स नव्हे, तर डिस्प्ले देखील उपलब्ध करुन दिला जातो. ज्यावर तुम्हाला बॅटरीची सद्य परिस्थितीची माहिती मिळवता येते. अशा काही स्वस्त आणि मस्त पावर बँकची माहिती जाणून घेऊयात...
Toerto TOR-69 Power X-4
Toreto पावर बँकमध्ये डिजिटल LED डिस्प्ले देण्यात येतो. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला बॅटरीची लाइफची माहिती मिळते. 10000mAh बॅटरीची क्षमता असलेल्या या पावर बँकमध्ये 12W ची फास्ट चार्जिंगची सोय मिळते. अॅमेझॉनवरुन तुम्ही ही पावर बँक १४४९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.
Callmate T804
अॅमेझॉनवर Callmate T804 पावर बँक ४० टक्के डिस्काऊंट दिला जात आहे. यात बॅटरी लाइफची माहिती देण्यासाठी एक डिजिटल डिस्प्ले पावर बँकवर देण्यात आला आहे. पावर बँक 40000mAh बॅटरीसह उपलब्ध आहे. याची किंमत २,३९९ रुपये इतकी आहे. यात LED लाइट्स देखील देण्यात आल्या आहेत.
I KALL IKPB10D
या प्रोडक्टवर तुम्हाला ५० टक्के डिस्काऊंट मिळवता येऊ शकेल. 10000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. यात दोन पावर इनपूट पोर्ट आहेत. ही तुम्हाला ६९८ रुपयांना विकत घेता येऊ शकेल. यात ड्युअर USB आऊटपूट पोर्ट देखील उपलब्ध आहे.
UBON PB-X32
अॅमेझॉनवर तुम्हाला UBON PB-X32 पावर बँक तुम्हाला अवघ्या १,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. यात 10000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी V8 चार्जिंग पॉइंटसह येते. यात टाइप-सी, लाइटनिंग, USB A आणि मायक्रो USB असे चार आऊटपूट देण्यात आले आहेत. याचा वापर करुन तुम्ही तुमचा फोन सहज चार्ज करू शकता.