Amazon Prime Day 2021 Sale: किफायतशीर 5G स्मार्टफोन्सवर डिस्काउंट; किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी
By सिद्धेश जाधव | Published: July 26, 2021 03:00 PM2021-07-26T15:00:29+5:302021-07-26T15:01:39+5:30
Budget 5G smartphones: तुम्ही एखादा 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्या बजेटमध्ये बसतील अश्या 5G स्मार्टफोन्सची यादी आम्ही घेऊन आलो आहोत.
आज Amazon Prime Day 2021 सेलची सुरुवात झाली आहे. हा सेल उद्या म्हणजे 27 जुलै पर्यंत सुरु राहील. या सेलमध्ये अनेक लोकप्रिय स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्सवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. यात अनेक 5G स्मार्टफोन्सचा देखील समावेश आहे. जर तुम्ही एखादा 5G स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट कमी असेल तर तुमच्या बजेटमध्ये बसतील अश्या 5G स्मार्टफोन्सची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. पुढील स्मार्टफोन्स 20,000 पेक्षा कमी किंमतीत 5G क्षमतेसह दमदार स्पेसिफिकेशन्स देतात.
Samsung Galaxy A22 5G
सॅमसंगच्या ‘ए सिरीज’ मधील भारतात लाँच झालेला हा पहिला 5G स्मार्टफोन आहे. Samsung Galaxy A22 5G मध्ये मीडियाटेक डायमेनसिटी 700 SoC आणि 8GB पर्यंतचा रॅम देण्यात आला आहे. यात फुल एचडी+ डिस्प्लेसह 48MP मुख्य कॅमेरा असेलला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. हा फोन 8MP च्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हा फोन 2,500 डिस्काउंटनंतर 19,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
Realme Narzo 30 5G
मीडियाटेक डायमेनसिटी 700 प्रोसेसरसह Realme Narzo 30 5G स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते. या स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर आणि दोन 2MP चे कॅमेरा सेन्सर मिळतात. हा फोन 90Hz रिफ्रेश रेट असलेल्या फुल एचडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्काउंटनंतर हा फोन 17,290 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे.
iQOO Z3 5G
गेल्याच महिन्यात विवोच्या सब-ब्रँड आयक्यूने iQOO Z3 5G स्मार्टफोन बाजारात सादर केला होता. या फोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 768G प्रोसेसर 5G कनेक्टिव्हिटीसह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमधील आयपीएस एलसीडी डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 64MP च्या मुख्य कॅमेरा सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. हा फोन 1,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Oppo A74 5G
ओप्पोच्या स्वस्त 5G स्मार्टफोन पैकी एक मॉडेल Oppo A74 5G काही दिवसांपूर्वी भारतात लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनयामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 480G चिपसेट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह फुल एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. या फोनमधील क्वाड रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाईड लेन्स, 2MP चा मॅक्रो सेंट आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. हा फोन 17,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.