टीव्हीनंतर ऑनलाईन एंटरटेनमेंट देखील महागणार; Amazon Prime Membership चे दर वाढणार
By सिद्धेश जाधव | Published: October 21, 2021 04:57 PM2021-10-21T16:57:17+5:302021-10-21T16:57:24+5:30
Amazon Prime Membership New Plans: अॅमेझॉन इंडिया देशात प्राइम मेंबरशिप मध्ये दरवाढ करणार आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईटनुसार मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅनची किंमत वाढवण्यात येईल.
याच आठवड्यात बातमी आली होती कि 1 डिसेंबरपासून झी, स्टार, सोनी आणि Viacom18 हे ब्रॉडकास्टींग नेटवर्क काही चॅनल्स आपल्या बुकेतून बाहेर काढणार आहेत. त्यामुळे टीव्ही चॅनल पॅकची किंमत 50 टक्क्यांनी वाढू शकते. या दरवाढीमुळे ग्राहक ऑनलाईन ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे वळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. तर तिकडे देखील मेंबरशिप फी वाढवण्याची मालिका सुरु आहे.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्याच्या आधी Disney Plus Hotstar ने आपल्या प्लॅन्सची किंमत बदलली होती. तर आता अॅमेझॉन इंडिया देशात प्राइम मेंबरशिप मध्ये दरवाढ करणार आहे. अॅमेझॉनच्या वेबसाईटनुसार मासिक, तिमाही आणि वार्षिक प्लॅनची किंमत वाढवण्यात येईल.
Amazon Prime Membership New Price
अॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप सध्या 129 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी दरवाढीनंतर 179 रुपये करण्यात येईल. तर 3 महिन्यांसाठी आता 329 च्या ऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जी आधी 999 रुपयांमध्ये उपलब्ध होती. म्हणजे कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे. या बदलाची अचूक तारीख कंपनीने सांगितली नाही, लवकरच हे प्लॅन लागू होतील असे सांगण्यात आले आहे.
याव्यतिरिक्त 18-24 वर्षांच्या ग्राहकांसाठी कंपनीने Prime Young Adult प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यात या ग्राहकांना उपरोक्त किंमतीवर कॅशबॅक दिला जाईल.
- Prime Young Adult Monthly: 89 रुपये (90 रुपये कॅशबॅक)
- Prime Young Adult Quarterly: 229 रुपये (230 रुपये कॅशबॅक)
- Prime Young Adult Yearly: 749 रुपये (750 रुपये कॅशबॅक)