पैसे वाचवण्याचा आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून 500 रुपयांनी महागणार Amazon Prime मेंबरशिपसाठी
By सिद्धेश जाधव | Published: December 13, 2021 02:58 PM2021-12-13T14:58:05+5:302021-12-14T13:56:50+5:30
Amazon Prime Membership New Price: आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुम्ही तुमची मेंबरशिप रिन्यू केली तर तुम्हाला जुन्या दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. असं केल्यानं वार्षिक मेंबरशिपवर 500 रुपयांची बचत करता येईल.
अॅमेझॉननं आपल्या Amazon Prime मेंबरशिपची किंमती वाढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. हा बदल उद्यापासून म्हणजे 14 डिसेंबरपासून अस्तित्वात येणार आहे. कंपनीनं ऑक्टोबरमध्ये नव्या दरांची घोषणा केली होती. परंतु आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुम्ही तुमची मेंबरशिप रिन्यू केली तर तुम्हाला जुन्या दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. असं केल्यानं वार्षिक मेंबरशिपवर 500 रुपयांची बचत करता येईल.
Amazon Prime Membership New Price
अॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप सध्या 129 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी दरवाढीनंतर 179 रुपये करण्यात येईल. तर 3 महिन्यांसाठी आता 329 च्या ऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जी आधी 999 रुपयांमध्ये उपलब्ध होती. म्हणजे कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे.
याव्यतिरिक्त 18-24 वर्षांच्या ग्राहकांसाठी कंपनीने Prime Young Adult प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यात या ग्राहकांना उपरोक्त किंमतीवर कॅशबॅक दिला जाईल.
- Prime Young Adult Monthly: 89 रुपये (90 रुपये कॅशबॅक)
- Prime Young Adult Quarterly: 229 रुपये (230 रुपये कॅशबॅक)
- Prime Young Adult Yearly: 749 रुपये (750 रुपये कॅशबॅक)