आता फक्त 70 रुपयांमध्ये मिळवा Amazon Prime चे सबस्क्रिप्शन, काय फायदे मिळतील..?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 08:12 PM2024-06-11T20:12:48+5:302024-06-11T20:13:10+5:30
Amazon Prime Subscription: या प्लॅनमध्ये तुम्हाला प्राइम म्युझिकचा अॅक्सेसही मिळेल.
Amazon Prime Lite Subscription : सध्याच्या डिजिटल युगात अनेक लोक त्यांच्या फोनवर कंटेट पाहण्यास प्राधान्य देतात. यापैकी बहुतांशी लोकांना OTT वर वेब सिरीज/चित्रपट पाहण्याची आवड आहे. OTT च्या विभागात Amazon Prime सर्वात लोकप्रिय आहे. पण, याची सबस्क्रिप्शन फी महाग असल्यामुळे बरेच लोक इच्छा असूनही ते खरेदी करत नाहीत. पण, आता तुम्ही अवघ्या 70 रुपयांमध्ये Amazon Prime चा आनंद घेऊ शकता.
कंपनीने आपल्या यूजर्ससाठी एक लाइट प्लान लॉन्च केला आहे. या प्लॅनमुळे तुम्ही स्वस्तात Amazon Prime चा आनंद घेऊ शकता. या Amazon Prime Lite ची सबस्क्रिप्शन किंमत 799 रुपये आहे. यात तुम्हाला एका वर्षाची वैधता मिळते. म्हणजेच, तुमचा मासिक खर्च फक्त 70 रुपये असेल. या योजनेचा वापर तुम्ही तुमच्या कोणत्याही डिव्हाइसवर म्हणजे मोबाईल, टॅबलेट किंवा टीव्हीवर करू शकता.
या प्लॅनमध्ये तुम्हाला तुमचा आवडता कंटेंट HD 720p मध्ये पाहता येईल. याशिवाय तुम्हाला या सबस्क्रिप्शनमध्ये प्राइम म्युझिकचा ॲक्सेसही मिळेल. या प्लॅनची निगेटिव्ह बाब म्हणजे, यात तुम्हाला जाहिराती दिसतात, ज्यामुळे अनेक युजर्सनी तक्रार केली आहे.
Amazon Prime नियमित सबस्क्रिप्शन
तुम्हाला जाहिरातींशिवाय कंटेट पाहायचा असेल तर चुकूनही लाइट सबस्क्रिप्शन खरेदी करू नका. तुम्ही नियमित योजना खरेदी करू शकता. Amazon Prime च्या वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत 1499 रुपये आहे. याशिवाय, तुम्हाला 3 महिन्यांचा प्लान घ्यायचा असेल, तर तुम्हाला तो 599 रुपयांना मिळेल. त्याची मासिक किंमत 299 रुपये आहे.