Amazon Prime ने आपल्या प्लॅन्सच्या किंमतीत केला बदल, पाहा संपूर्ण Price List
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:51 AM2023-04-27T08:51:33+5:302023-04-27T08:53:27+5:30
Amazon Prime : आता कंपनीने पुन्हा आपले प्लॅन्स बदलले आहेत.
नवी दिल्ली : अॅमेझॉन आपल्या प्राइम मेंबरशिपची (Amazon Prime) किंमत बदलत राहते. काही महिन्यांपूर्वी ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या प्राइम मेंबरशिपवर सवलतीच्या दरांची घोषणा केली होती. आता कंपनीने पुन्हा आपले प्लॅन बदलले आहेत.
तुम्हाला आता अॅमेझॉन प्राइमचा तिमाही प्लॅन 599 रुपयांमध्ये मिळू शकतो. यापूर्वी या प्लॅनची किंमत 459 रुपये होती. अॅमेझॉनने या प्लॅनच्या किमतींमध्ये 140 रुपयांची वाढ केली आहे. यासोबतच, चांगली बातमी अशी आहे की, दीर्घकालीन प्लॅनसाठी किंमती त्याच ठेवण्यात आल्या आहेत. वार्षिक अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपची किंमत 1,499 रुपये आहे आणि अधिकृत साइटवर वार्षिक प्राइम लाइट प्लॅनची किंमत 999 रुपये आहे.
अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप बेनिफिट्स
ज्या लोकांकडे अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप आहे, त्यांना प्राइम शिपिंगसाठी सपोर्ट मिळेल, जे बेसिक स्वरूपात पैसे न देता युजर्सपेक्षा जलद वितरण आहे. लोकांना प्राइम व्हिडिओ, प्राइम म्युझिक, प्राइम डील्स, प्राइम रीडिंग, प्राइम गेमिंग आणि अॅमेझॉन फॅमिलीचा अॅक्सेस मिळू शकतो.