Amazon ने वाढवलं नेटफ्लिक्स, हॉटस्टारचं टेन्शन; आधीपेक्षा स्वस्त Prime Video चा नवा प्लॅन, पाहा किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 05:07 PM2022-11-07T17:07:57+5:302022-11-07T17:46:16+5:30
Amazon Prime Video Mobile Subscription : Amazon ने भारतात नवीन Prime Video Mobile Subscription प्लॅन लॉन्च केला आहे.
Amazon ने भारतात नवीन Prime Video Mobile Subscription प्लॅन लॉन्च केला आहे. नावाप्रमाणेच, Prime Video Mobile Edition प्लॅन हा केवळ मोबाईल डिव्हाईससाठी सिंगल युजर प्लॅन आहे. नवीन प्राइम व्हिडीओ प्लॅनची किंमत 599 रुपये आहे आणि त्याची वैधता एक वर्ष आहे. म्हणजेच ग्राहक 599 रुपयांमध्ये वर्षभर मोबाईलवर प्राइम व्हिडीओ कंटेन्ट पाहू शकतात. Amazon Prime Video चं मोबाईल व्हर्जन एअरटेलच्या भागीदारीत गेल्या वर्षी सादर करण्यात आलं होतं आणि ते फक्त Airtel युजर्ससाठी उपलब्ध होतं. या प्लॅनची किंमत 89 रुपये प्रति महिना पासून सुरू होते आणि युजर SD गुणवत्तेत Amazon Prime वर कंटेन्ट पाहू शकतात.
Amazon ची नवीन प्राइम व्हिडिओ मोबाईल एडिशन सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. म्हणजेच फक्त एअरटेल ग्राहकांपुरते मर्यादित नाही. या नवीन प्लॅनमध्ये, युजर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध कंटेन्ट स्टँडर्ड डेफिनिशन (SD) गुणवत्तेत पाहू शकतील. जर युजर्सना हाय डेफिनिशन (HD) गुणवत्तेत सामग्री पाहायची असेल, तर त्यांना Amazon Prime चं स्टँडर्ड व्हर्जन अपग्रेड करावं लागेल ज्याची किंमत प्रति महिना 179 रुपये आणि प्रति वर्ष 1499 रुपये आहे.
Amazon च्या ओरिजनल कंटेन्टशिवाय, युजर्स 599 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये थेट क्रिकेट सामने देखील पाहू शकतील. याशिवाय प्राइम व्हिडिओसाठी आयएमडीबी पॉवर्ड एक्स-रे आणि ऑफलाइन पाहण्यासाठी शो डाउनलोड करणे यासारखी फीचर्स उपलब्ध असतील. असे दिसते की Amazon नेटफ्लिक्स आणि डिस्ने+ हॉटस्टारच्या मोबाईल प्लॅनला हे टक्कर देऊ शकतं. Amazon Prime Video Mobile Edition ची किंमत प्रति महिना 50 रुपये आहे तर Netflix च्या मोबाईल प्लॅनची किंमत 149 रुपये प्रति महिना आहे.
डिस्ने + हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शनसाठी, प्रति वर्ष 499 रुपये, प्रति महिना 41 रुपये मोजावे लागतात. लेटेस्ट Amazon Prime Mobile Edition प्लॅन खरेदी करायचा असल्यास, युजर्स Android किंवा iOS एपवर साइन अप करू शकतात किंवा PrimeVideo.com वर जाऊन प्लॅन सबस्क्राइब करता येईल. याशिवाय युजर्स त्यांची इच्छा असल्यास भविष्यात कधीही दुसर्या प्लॅनमध्ये अपग्रेड करू शकतात.