चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! सब्सक्रिप्शन न घेता Amazon वर बघता येणार आवडीचा मुव्ही 

By सिद्धेश जाधव | Published: May 4, 2022 07:48 PM2022-05-04T19:48:51+5:302022-05-04T19:48:58+5:30

Amazon Prime Video नं भारतात नवीन फिचर लाँच केलं आहे, त्यामुळे एक चित्रपट बघण्यासाठी संपूर्ण वर्षाचं सब्सस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.  

Amazon Prime Video Now Lets You Rent Movies In India  | चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! सब्सक्रिप्शन न घेता Amazon वर बघता येणार आवडीचा मुव्ही 

चित्रपटप्रेमींसाठी खुशखबर! सब्सक्रिप्शन न घेता Amazon वर बघता येणार आवडीचा मुव्ही 

googlenewsNext

Amazon नं भारतात Amazon Prime Store ही सेवा भारतात लाँच केली आहे. या सर्व्हिसमुळे कोणीही त्यांच्या आवडीचा चित्रपट सब्सस्क्रिप्शन न घेता बघू शकेल. हे सेवा Prime सब्सक्रायबर्स आणि नॉन-सब्सक्रायबर्स दोन्हींसाठी सादर करण्यात आली आहे. हे सर्व्हिस त्या लोकांसाठी चांगली आहे जे लोक मासिक प्लॅन घेऊ इच्छित नाहीत.  

Amazon च्या या सर्विसमधून भारतीय युजर्स हॉलिवूड, बॉलिवूड आणि अन्य स्वदेशी भाषेंमधील चित्रपट रेंटवर घेऊ शकतील. त्यामुळे युजर्स त्यांच्या आवडीचा चित्रपट बघण्यासाठी मासिक सदस्यत्व घेण्याची गरज नाही. Amazon Prime Video ची ही सेवा Google YouTube च्या ‘रेंट अ मुव्ही’ सारखीच आहे.  

इथे तुम्ही कोणताही चित्रपट रेंटवर घेऊ शकता. ज्याचं भाडं 69 रुपयांपासून 499 रुपयांच्या आत असेल. तसेच एकदा रेंटवर घेतलेला चित्रपट 30 दिवसांपर्यंत बघता येईल. एकदा मुव्ही बघायला सुरुवात केली की मात्र 48 तासांच्या आत तो पूर्ण करावा लागेल. कारण त्यांनतर त्या मुव्हीचा अ‍ॅक्सेस काढून घेण्यात येईल.  

Prime Video Store सब्सक्रायबर्स तसेच नॉन-सब्सक्रायबर्सना वापरता येईल फक्त Amazon चं अकाऊंट मात्र असावं लागेल. मूवी रेंटवर घेण्यासाठी अ‍ॅप किंवा ब्राऊजरमध्ये Amazon Prime Store ओपन करावं लागेल. त्यानंतर स्टोर टॅबमध्ये जाऊन तुम्हाला हवा तो मुव्ही निवडू शकता. रेंट बटनवर क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या Amazon अकाऊंटमध्ये साइन इन करून पेमेंट करू शकाल.  

Web Title: Amazon Prime Video Now Lets You Rent Movies In India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.