अॅमेझॉनच्या ग्रेट इंडिया सेलमध्ये १६ कोटी उत्पादने; ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 02:24 AM2018-10-09T02:24:40+5:302018-10-09T03:09:56+5:30
अग्रणी आॅनलाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉनने ‘ग्रेट इंडिया सेल’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना तब्बल १६ कोटी उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्री सुरू होणारा हा सेल १५ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपेल.
मुंबई : अग्रणी आॅनलाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅमेझॉनने ‘ग्रेट इंडिया सेल’ची घोषणा केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना तब्बल १६ कोटी उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्री सुरू होणारा हा सेल १५ आॅक्टोबरला रात्री ११ वाजून ५९ मिनिटांनी संपेल.
अॅमेझॉनने या सेलसाठी चार प्रमुख निश्चित केली आहेत. ग्राहक मिळविण्यापेक्षा स्पर्धात्मक दृष्टीकोन, कल्पकतेची जिद्द, दैनंदिन कामकाजातील व्यावसायिक नैपुण्य व दीर्घकालिन विचार यांचा यात समावेश आहे.
या सेलमध्ये ग्राहकांना ‘कॅश आॅन डिलिव्हरी’ची सुविधा दिलेली आहे. त्याखेरीज खरेदीचे नानावीध पर्याय ही उपलब्ध करु दिले आहेत. खरेदीवर त्यांना अनेक वेगवेगळ्या आॅफर्स मिळणार आहेत. आगामी दिवाळीच्या निमित्ताने गृह सजावटीच्या वस्तूंचा यात मोठा समावेश असेल. यात स्वयंपाकघरातील उपकरणांवर ३५ टक्क्यांपर्यंत तर सर्व मोठ्या ब्रॅण्ड्सच्या कपड्यांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत, दिली जाणार आहे. स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, पुस्तके आदी सर्वच वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे. स्वत:ची फॅशन काळानुरुप आधुनिक करण्यासाठी खास ‘अॅमेझॉन वॉर्डरोब रिफ्रेश सेल’चाही यात समावेश करण्यात आला आहे. त्याअंतर्गत आंतरराष्टÑीय ब्रॅण्ड्सवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
‘ग्रेट इंडिया सेल’ हा एक फेस्टिव्हल असल्याचे अॅमेझॉनने घोषित केले आहे. त्यामध्ये अॅमेझॉन प्राइमच्या सदस्यांना प्राधान्य असेल. सर्वोत्तम उत्पादने, सर्वोत्तम किंमत, सर्वोत्तम आॅफर्स, वस्तूंची लवकरात लवकर डिलिव्हरी, कॅश आॅन डिलिव्हरी, मासिक हफ्त्यावर खरेदीची सोय हे या फेस्टिव्हलचे वैशिष्ट्य असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.