TWS Earbuds: फक्त 1,599 रुपयांमध्ये 29 तासांच्या बॅटरी लाईफसह Ambrane Dots Tune लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये
By सिद्धेश जाधव | Published: December 1, 2021 07:15 PM2021-12-01T19:15:03+5:302021-12-01T19:15:48+5:30
Budget TWS Earubds: Ambrane Dots Tune इयरबड्स इन-ईयर कम्फर्ट फिट डिजाईनहं सादर करण्यात आले आहेत. यातील IPX4 रेटिंग स्वेट आणि वॉटर रेजिस्टन्स देते.
Ambrane नं आपल्या ऑडिओ अॅक्सेसरीजच्या पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं Ambrane Dots Tune नावाचे TWS Earbuds भारतात लाँच केले आहेत. हे बड्स सिंगल चार्जवर 29 तासांची बॅटरी लाईफ देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच यात वॉयस कमांड सपोर्ट आणि अल्ट्रा इन-ईयर कंफर्ट डिजाईन देण्यात आली आहे.
Ambrane Dots Tune चे स्पेसिफिकेशन्स
Ambrane Dots Tune इयरबड्स इन-ईयर कम्फर्ट फिट डिजाईनहं सादर करण्यात आले आहेत. दिवसभराचा वापर लक्षात घेऊन ही डिजाईन देण्यात आली आहे. यातील ड्युअल ड्युअल मायक्रोफोन चांगली कॉल क्वॉलिटी देण्यास मदत करतात. कनेक्टिव्हिटीसाठी डॉट्स ट्यूनमध्ये ब्लूटूथ 5.1 मिळते. त्यामुळे यूनिक साउंड क्वालिटी आणि 10 मीटर पर्यंत स्टेबल कनेक्टिव्हिटी मिळते.
Ambrane Dots Tune मध्ये कॉल आणि म्यूजिक नियंत्रित करण्यासाठी मल्टी-फंक्शनल टच सेन्सर देण्यात आला आहे. तसेच हे इयरबड्स फोनमधील व्हॉइस असिस्टंट देखील नियंत्रित करता येतात. यातील IPX4 रेटिंग स्वेट आणि वॉटर रेजिस्टन्स देते. या अॅम्ब्रेन इयरबड्समध्ये 10mm स्पिकर ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे, जी हाय बेस आणि ऑथेंटिक साऊंड एक्सपीरियंस देतात. डॉट्स ट्यून इयरबड्स चार्जिंग केससह एकूण 29 तासांपर्यंतचा प्लेबॅक टाईम देतात. फक्त इयरबड्स 6.5 वापरता येतात.
Ambrane Dots Tune ची किंमत
Ambrane Dots Tune ची किंमत 2199 रुपये आहे, परंतु कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर हे बड्स 1599 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. हे बड्स व्हाईट, ब्लॅक आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध आहेत आणि सोबत एका वर्षाची वॉरंटी मिळते. कंपनीच्या वेबसाईटसह अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि टाटा क्लिकवरून देखील हे ट्रू वायरलेस इयरबड्स विकत घेता येतील.