2,000 रुपयांपेक्षा कमी! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह Ambrane Wise Eon स्मार्टवॉच भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: May 11, 2022 04:07 PM2022-05-11T16:07:06+5:302022-05-11T16:07:38+5:30

Ambrane Wise Eon स्मार्टवॉच भारतात ब्लटूथ कॉलिंगसह सादर करण्यात आलं आहे.  

Ambrane Wise Eon Smartwatch Launched In India With Bluetooth Calling Feature   | 2,000 रुपयांपेक्षा कमी! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह Ambrane Wise Eon स्मार्टवॉच भारतात लाँच 

2,000 रुपयांपेक्षा कमी! 10 दिवसांच्या बॅटरी लाईफसह Ambrane Wise Eon स्मार्टवॉच भारतात लाँच 

Next

Ambrane या भारतीय ब्रँडनं आपल्या स्मार्टवॉच पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं नव्या Wise सीरिजमध्ये Ambrane Wise Eon स्मार्टवॉच लाँच केलं आहे. व्हॉइस असिस्टंट, ब्लूटूथ कॉलिंग, SpO2 सेन्सर, ब्लड प्रेशर मॉनिटर आणि हार्ट रेट सेन्सर असलेल्या या स्मार्टवॉचची किंमत देखील परवडणारी आहे. हे स्मार्टवॉच 1999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वरून तुम्ही खरेदी करू शकता.  

स्पेसिफिकेशन 

Ambrane Wise Eon मध्ये 1.69 इंचाचा टच डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 450 Nits पीक ब्राईटनेस आणि 240×280 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. ब्लूटूथ कॉलिंग फिचरसाठी या वॉचमध्ये इनबिल्ट डायलर, मायक्रोफोन आणि स्पिकर मिळतो. या स्मार्टवॉचमध्ये वॉयस असिस्टंट सपोर्ट मिळतो. 100 पेक्षा जास्त क्लाउड बेस्ड वॉच फेस कस्टमायजेशनसाठी मदत करतात. 

यात SpO2 सेन्सर, ब्लड प्रेशर ट्रॅकिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग, ब्रीदिंग ट्रेनिंग, कॅलरी ट्रॅकिंग आणि अन्य हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच 60 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड मिळतात. पाणी आणि धुळीपासून बचाव करण्यासाठी IP68 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. हे स्मार्टवॉच सिंगल चार्जवर 10 दिवस वापरता येतं. Ambrane Wise Eon मध्ये तीन गेम देखील मिळतात. तसेच अलार्म, स्टॉपवॉच, रिमोट कॅमेरा, म्यूजिक प्लेयर, सेडेंटरी अलर्ट आणि असे अनेक फीचर्स मिळतात.  

Web Title: Ambrane Wise Eon Smartwatch Launched In India With Bluetooth Calling Feature  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.