अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये घड्याळ आवडलं, मार्क झुकेरबर्ग यांनी खरेदीच केलं; सोशल मीडियावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:03 IST2024-09-04T19:02:54+5:302024-09-04T19:03:32+5:30
Mark Zukerberg : अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगमध्ये मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला चान यांनी उपस्थिती लावली होती.

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये घड्याळ आवडलं, मार्क झुकेरबर्ग यांनी खरेदीच केलं; सोशल मीडियावर चर्चा
मागील काही दिवसापूर्वी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या सोहळ्याला जगभरातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला चान यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला अनंत अंबानी यांचं महागडे घड्याळ पाहत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी त्यांना हे घड्याळ आवडल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता तसेच एक घड्याळ झुकेरबर्ग यांच्या हातात दिसत आहे.
Akhilesh Yadav : आज नाही तर उद्या, योगी आदित्यनाथ भाजपा सोडणार?; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ
दोन दिवसापूर्वी झुकेरबर्ग यांनी पत्नी प्रिसीला यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत झुकेरबर्ग यांच्या हातात एक मोठं घड्याळ दिसत आहे. हे घड्याळ प्लॅटिनम पॅटेक फिलिप इन-लाइन पर्पेच्युअल आहे, याची किंमत सुमारे १.१८ कोटी रुपये आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा मार्च २०२४ मध्ये प्री-वेडिंग सोहळा झाला. या सोहळ्याला झुकेरबर्ग यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते अनंत अंबानींच्या घड्याळाचे कौतुक करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत झुकेरबर्ग यांच्या पत्नी अनंत अंबानी यांचं घड्याळ पाहत असल्याचे दिसत आहे. यानंतर झुकेरबर्गही पाहत असल्याचे दिसत आहे. यावेळी मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, मला घड्याळ घालणे फारसे आवडत नाही पण असेच घड्याळ घालायला आवडेल.
या घड्याळाची माहिती Patek Philippe च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या माहितीनुसार, घड्याळामध्ये एक नवीन कॅलेंडर आहे, यामध्ये एक डिस्प्ले आहे. यामध्ये, दिवस, तारीख आणि महिना आहे.