अरे वा! अँड्रॉइड अ‍ॅप्स वापरता येणार लॅपटॉपवर; या युजर्सना मिळेल Windows 11 मोफत

By सिद्धेश जाधव | Published: June 25, 2021 11:38 AM2021-06-25T11:38:10+5:302021-06-25T11:40:56+5:30

Windows 11 new Featuers: सहा वर्षानंतर मायक्रोसॉफ्टने Windows 11 नावाची ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली आहे.  

Android apps will be availabe on on windows 11   | अरे वा! अँड्रॉइड अ‍ॅप्स वापरता येणार लॅपटॉपवर; या युजर्सना मिळेल Windows 11 मोफत

Windows 11 फ्री अपग्रेड म्हणून उपलब्ध होईल.

Next

Microsoft ने काल एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून आपली नवीन ऑपरेटिंग सिस्टम Windows 11 लाँच केली आहे. कंपनीने अजूनही या ऑपरेटिंग सिस्टमच्या उपलब्धतेची तारीख सांगितली नाही. परंतु यावर्षीच्या शेवटपर्यंत ही ऑपरेटिंग सिस्टम युजर्सना डाउनलोडसाठी उपलब्ध होईल असे कंपनीने सांगितले आहे. (Microsoft is bringing Android apps to Windows 11 via Amazon's app store) 

Windows 11 फ्री अपग्रेड म्हणून उपलब्ध होईल. जर तुमच्याकडे Windows 10 असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असेल तर तुम्हाला Windows 11 मोफत मिळण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक ते हार्डवेअर असणे अपेक्षित आहे. यात 4GB रॅम, 64GB फ्री स्टोरेज स्पेस आणि एक 64-bit प्रोसेसर यांचा समावेश करण्यात आला आहे. या आवश्यकता मोठ्या प्रमाणावर विंडोज 10 सारख्या आहेत त्यामुळे विंडोज 10 युजर्सना नवीन ऑपरेटिंग सिस्टमवर मोफत अपग्रेड करता येईल.  

मायक्रोसॉफ्टच्या नवीन नवीन Windows 11 ऑपरेटिंग सिस्टममध्ये मोठ्या प्रमाणावर डिजाईन बदलण्यात आली आहे. यात नवीन स्टार्ट मेनू देण्यात आला आहे, तसेच स्टार्ट बटणमध्ये देखील बदल करण्यात आला आहे. स्टार्ट मेनू आणि टास्कबार स्क्रीनच्या मध्यभागी आणण्यात आले आहेत. Windows 11 मध्ये अमेझॉन अ‍ॅप स्टोरवरील अँड्रॉइड 5,00,000 अ‍ॅप्स वापरता येतील आणि चांगल्या गेमिंगसाठी ऑटो एचडीआर देखील देण्यात आला आहे.  

Web Title: Android apps will be availabe on on windows 11  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.