चोरी झालेला Android Phone लगेच मिळणार, स्विच ऑफ झाल्यावरही कळणार लाइव्ह लोकेशन!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 01:13 PM2022-11-14T13:13:00+5:302022-11-14T13:13:37+5:30
स्मार्टफोनचा वापर वेगानं वाढतो आहे. स्मार्टफोन विना आपली अनेक कामं रखडून पडतात. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपला फोन हरवतो किंवा तो चोरीला जातो.
नवी दिल्ली-
स्मार्टफोनचा वापर वेगानं वाढतो आहे. स्मार्टफोन विना आपली अनेक कामं रखडून पडतात. पण अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपला फोन हरवतो किंवा तो चोरीला जातो. पण आता तुम्ही तुमचा चोरीला गेलेला फोन अगदी सहजपणे ट्रॅक करू शकणार आहात. फोन स्विच ऑफ झाला की ट्रॅक करणं अवघड असतं. पण आता फोन स्विच ऑफ झाल्यानंतरही तो ट्रॅक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला एक अँड्रॉइड अॅप उपयोगी ठरणार आहे.
फोन स्विच ऑफ असेल तरी त्याचं लोकेशन कसं शोधायचं हेच आपण आता जाणून घेणार आहोत. पण त्याआधी तुमचा फोन चोरीला गेला असेल तर सर्वात आधी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार नोंदवणं सगळ्यात महत्वाचं आहे. पोलिसांनाही तुम्ही तुमचा फोन ट्रॅक करण्याची विनंती करू शकता. बहुतांश प्रकरणांमध्ये पोलीस फोन ट्रॅक करतात आणि योग्य मालकाकडे तो सुपूर्द देखील करतात. पण काही सेफ्टी ट्रिक्सचा वापर करुन तुम्ही तुमचा फोन सहजपणे ट्रॅक करू शकता.
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत अॅप्स
Track it EVEN if it is off हे अँड्रॉइड यूझर्ससाठीचं अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करू शकता. याचं रेटिंग देखील चांगलं आहे. हे अॅप Hammer Security नं विकसीत केलं आहे. याचा सेटअप प्रोसेस देखील अतिशय सोपा आहे. अॅप डाऊनलोड झाल्यानंतर ते ओपन करुन काही परमिशन्स द्याव्या लागतील. यात एक फिचर डमी स्विच ऑफ आणि फ्लाइट मोडचं आहे. यात फोन स्विच ऑफ केल्यानंतरही तो पूर्णपणे बंद होत नाही. पण चोराला वाटेल की तो फोन बंद झाला आहे.
लोकेशनची माहिती मिळणार
तुमच्या डिव्हाइसची संपूर्ण माहिती आणि अॅक्टीव्हीटी जसं की लोकेशन, ज्याच्या हातात फोन आहे त्याचा सेल्फी आणि इतर माहिती तातडीनं यूझरच्या आपत्कालीन क्रमांकावर पाठवली जाते. तसंच हे अॅप फोनचं लाइव्ह लोकेशन देखील युझरला दाखवतं. फोन ट्रॅक करणं अतिशय सोपं झालं आहे. जर तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हे अतिशय उपयोगी अॅप आहे. यात गुगल प्ले स्टोअरला चांगली रेटिंगही मिळाली आहे. फोन चोरी झाल्यास याचा चांगला उपयोग होऊ शकतो.