लॉक झालेला अॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात करा 'अनलॉक'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 01:03 PM2019-07-09T13:03:56+5:302019-07-09T13:18:59+5:30
फोन लॉक झाल्यास घाबरून जाण्याची काही गरज नाही. लॉक झालेला अॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात कसा अनलॉक करायचा हे जाणून घेऊया.
नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. फोनची सुरक्षितता ही सर्वात जास्त महत्त्वाची असते. त्यामुळेच युजर्स फोनमध्ये अनेक अॅप इन्स्टॉल करत असतात. तसेच फोनमध्येही पॅटर्न लॉक, पासवर्ड यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. अनेकदा काही जण आपला फोन ओपन करतात. त्यांनी तो ओपन करू नये यासाठी युजर्स पासवर्ड ठेवतात. मात्र काही वेळा तो पासवर्ड विसरल्यामुळे फोन लॉक होतो. फोन लॉक झाल्यास घाबरून जाण्याची काही गरज नाही. लॉक झालेला अॅन्ड्राईड स्मार्टफोन काही सेकंदात कसा अनलॉक करायचा हे जाणून घेऊया.
पहिली पद्धत
- Android Phone चा वापर करत असाल तर फोन लॉक झाल्यानंतर अॅन्ड्राईड डिव्हाईस मॅनेजरची मदत घ्या. ही सर्व्हिस तुमच्या गुगल अकाऊंटसोबत कनेक्ट असते.
- संगणकावरून जीमेल अकाऊंट लॉग इन करा.
- अॅन्ड्राईड डिव्हाईस मॅनेजरमध्ये तुमचं डिव्हाईस सर्च करा. त्यावेळी ते अनलॉक केलं जातं.
- यासाठी इंटरनेट कनेक्शनची गरज आहे.
दुसरी पद्धत
- फोनचा लॉक पॅटर्न विसरला असाल किंवा इतर कोणीतरी पॅटर्न बदलला असेल तर फॉरगेट पासवर्डच्या मदतीने पॅटर्न बदला.
- फॉरगेट पासवर्ड बदलण्यासाठी जीमेल अथवा गुगल अकाऊंटची माहिती द्या.
- यानंतर अकाऊंटवर एक ई-मेल येईल. त्यावर क्लिक केल्यास नवा पॅटर्न सेट करू शकता.
तिसरी पद्धत
- लॉक झालेला फोन अनलॉक करण्यासाठी ही सर्वात सोपी पद्धत आहे. मात्र हे करताना डेटा डिलीट होण्याची शक्यता ही अधिक असते.
- फोनची स्विच ऑन होताच वॉल्यूम बटण, होम आणि पॉवर बटण एकत्र दाबा.
- असं केल्यास स्क्रीनवर काही पर्याय दिसतील. त्यामध्ये फॅक्ट्री रीसेटचा देखील एक पर्याय मिळेल.
- फॅक्ट्री रिसेट सिलेक्ट केल्यास फोन नव्या सिस्टमप्रमाणे काम करण्यासस सुरुवात करेल.
जुन्या Android फोनमधून नव्या फोनमध्ये Contacts असे करा ट्रान्सफर
बापरे! टायपिंग ऐकून पासवर्ड हॅक करू शकतात हॅकर्स
टेक्नॉलॉजीच्या जगात हॅकींगचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हॅकींगचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. केवळ टायपिंगचा आवाज ऐकून हॅकर्स पासवर्ड हॅक करू शकतात अशी नवी माहिती आता समोर आली आहे. साऊंडवेव्सच्या मदतीने या गोष्टी केल्या जातात. स्मार्टफोनच्या कीबोर्डवर युजर्स टाईप करतात तेव्हा त्यातून काही साऊंडवेव बाहेर येतात. टायपिंगच्या वेळी स्क्रीनवर येणाऱ्या प्रत्येक स्ट्रोकचं वेगळं व्हायब्रेशन असतं. मात्र हे व्हायब्रेशन कानाला ऐकू येत नाही. हॅकर्स साऊंडवेवच्या मदतीने पासवर्ड हॅक करतात. टायपिंगचं व्हायब्रेशन ते अॅप्सच्या मदतीने ऐकू शकतात. काही खास अॅप्स आणि अल्गोरिदमने स्मार्टफोनवरून तयार होणाऱ्या साऊंडवेव ऐकता आणि डीकोड करता येतात.