अलर्ट! तुमच्या फोनमध्ये लपलाय 'हा' खतरनाक मालवेअर; बँक खात्यातून चोरतो पैसे अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 08:10 PM2024-08-04T20:10:27+5:302024-08-04T20:11:51+5:30
एक नवीन Android मालवेअर आला आहे जो तुमच्या बँक खात्यातून सहजपणे पैसे चोरू शकतो.
हॅकर्स नेहमीच लोकांची विविध प्रकारे फसवणूक करत असतात. अशीच एक धक्कादायक बाब आता समोर आली आहे. एक नवीन Android मालवेअर आला आहे जो तुमच्या बँक खात्यातून सहजपणे पैसे चोरू शकतो. तुमची संपूर्ण सिस्टम फंक्शन हॅक करून ती डिसेबल करू शकतो आणि एसएमएसद्वारे इतर डिव्हाइसेसवर देखील पसरू शकतो.
या अतिशय धोकादायक अँड्रॉइड मालवेअरची माहिती एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिली आहे, ज्याचं नाव BingoMod आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा मालवेअर पहिल्यांदा मे २०२४ मध्ये दिसला होता. हा मालवेअर पुन्हा एकदा एक्टिव्ह झाला आहे. या मालवेअरपासून तुम्ही कसा बचाव करू शकता हे जाणून घेऊया...
सायबर सिक्युरिटी फर्म Clefi ने या नवीन मालवेअर BingMod बद्दल अलर्ट केलं आहे आणि सांगितलं आहे की, हा मालवेअर डिव्हाइसला संक्रमित करत आहे. या व्हायरसचे नाव BingoMod आहे जो मालवेअर डाउनलोड करण्यासाठी लोकांना खोटा मेसेज पाठवतो. मात्र, हा मेसेज पाहताच तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने मेसेज केल्याचं वाटतं. तो एक परिपूर्ण अँटीव्हायरस असल्याचं दर्शवतो आणि लोकांना फसवतो.
BingoMod मालवेअर Chrome Update, WebInfo, Secureza Web, InfoWeb आणि इतर अनेक नावांनी पाहिला गेला आहे. याला AVG अँटीव्हायरस असंही म्हटलं जातं. तुम्ही तुमच्या फोनवर जेव्हा पाहाल तेव्हा तुम्हाला तो अधिकृत असल्याचं दिसेल, कोणताही संशय येणार नाही. पण तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकाल.
या मालवेअरद्वारे हॅकर्स एक लिंक पाठवतात जी तुम्हाला टेक्स्ट मेसेजद्वारे येते. तुम्ही ते डाउनलोड करण्यासाठी एका लिंकवर क्लिक केलं की एप युजर्सना सिक्योरिटी प्रोटेक्शन इनेबल करण्यासाठी एक्सेसिबिलिटी सर्व्हिसेस एक्टिवेट करण्याची सूचना दिली जाते. एकदा युजर्सनी चुकून परवानगी दिली की, मालवेअर तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करतो.