ANI Twitter Locked: तुम्ही १३ वर्षांचे नाही, ट्विटरनं चक्क वृत्तसंस्था एएनआयचंच अकाऊंट केलं ब्लॅाक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:06 PM2023-04-29T16:06:05+5:302023-04-29T18:59:38+5:30
ट्विटरने देशातील आघाडीची वृत्तसंस्था एएनआयचे ट्विटर अकाउंट लॉक केले आहे.
ट्विटर उद्योगपती इलॉन मस्क यांच्या ताब्यात गेल्यापासून ट्विटरमध्ये अनेक मोठे निर्णय घेतले. अनेक कर्मचाऱ्यांना कमी करुन ब्लू टीकसाठी आता पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान, आता ट्विटरने भारतातील सर्वात मोठ्या वृत्त एजन्सी असलेल्या ANI चे अकाउंट ब्लॉक केलं आहे.
देशातील आघाडीची वृत्तसंस्था ANIचे ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. ट्विटरने शनिवारी दुपारी अचानक @ANI हँडल ब्लॉक केले. यानंतर, खात्यावर गेल्यावर, हे खाते अस्तित्वात नाही असे लिहिले. एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्विट केले की, ट्विटरने एएनआयचे अकाउंट ब्लॉक केले आहे. प्रकाश यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत म्हटले आहे की, ट्विटरने अकाउंट उघडणाऱ्याचे किमान वय १३ वर्षे असण्याचा नियम नमूद केला आहे. त्यांनी ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनाही टॅग केले. पुढच्या ट्विटमध्ये 'आम्ही १३ वर्षांपेक्षा कमी वयाचे नाही असं यात म्हटले आहे.
Acer Swift Go: लॉन्च झाला तगडा Laptop, फक्त 30 मिनिटात चार्ज अन् 4 तासांची बॅटरी लाइफ
ANI ने ट्विटरवर स्वतःचे वर्णन 'भारताची नंबर 1 मल्टीमीडिया न्यूज एजन्सी' असे केले आहे. आतापर्यंत, एएनआय – एएनआय हिंदी, एएनआय एमपी-राजस्थान, एएनआय यूपी-उत्तराखंड इत्यादींचे इतर ट्विटर हँडल चांगले काम करत आहे.