जिओचा आणखी एक विक्रम; आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 03:11 PM2018-11-21T15:11:21+5:302018-11-21T15:12:22+5:30

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या रिलायन्सच्या जिओने आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे.

Another record for Jio; International roaming service started | जिओचा आणखी एक विक्रम; आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु

जिओचा आणखी एक विक्रम; आंतरराष्ट्रीय रोमिंग सेवा सुरु

Next

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातलेल्या रिलायन्सच्या जिओने आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये 4 जी सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली असून जपानच्या केडीडीआयशी हातमिळवणी केली आहे. 


यामुळे जपानहून भारतात येणाऱ्या आणि भारतातून जपानला जाणाऱ्या नागरिकांना दोन्ही देशांमध्ये नंबर न बदलता 4 जी सेवेचा लाभ घेता येणार आहे. जपानी नागरिक भारतात इंटरनेट वापरासोबत व्हॉईस कॉलिंगही करू शकणार आहे. ही सेवा जिओ आणि केडीडीआयच्या वापरकर्त्यांनाच मिळणार आहे. 


20 महिन्यांत झाले वेगवान नेटवर्क
रिलायन्स जिओने सप्टेंबर 2016 मध्ये ४ जी सेवा सुरु केली होती. यानंतरच्या 20 महिन्यांत जिओ देशातील सर्वात जलद इंटरनेट सुविधा देणारे नेटवर्क बनले आहे. ट्रायच्या आकड्यांनुसार सप्टेंबर 2018 मध्ये जिओचा सरासरी डाऊनलोडींग स्पीड 20.6 एमबीपीएस होता.

Web Title: Another record for Jio; International roaming service started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.