वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 02:32 PM2022-04-11T14:32:18+5:302022-04-11T14:39:56+5:30

Antivirus Apps : गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या 6 अँटीव्हायरस Apps जवळपास 15 हजार अँड्रॉइड युजर्सचा पर्सनल डेटा चोरला आहे.

antivirus apps on google play store steal 15000 android smartphone users personal data | वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात

वेळीच व्हा सावध! 'हे' 6 धोकादायक Apps करतात पर्सनल डेटा चोरी; 15 हजार लोकांना ओढलं जाळ्यात

Next

नवी दिल्ली - अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणारे युजर्स नवीन मोबाईल Apps डाऊनलोड करण्यासाठी Google Play Store चा हमखास वापर करतात. परंतु कधीकधी काही Apps प्ले स्टोअरवर असे देखील येतात जे युजर्सना हानी पोहोचवण्यासाठी डिझाइन केलेले असतात. नुकतीच नवीन माहिती समोर आली आहे की, गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या 6 अँटीव्हायरस Apps जवळपास 15 हजार अँड्रॉइड युजर्सचा पर्सनल डेटा चोरला आहे.

6 अँटीव्हायरस Apps चा शोध घेतल्यानंतर, Google ने हे Apps Google Play Store वरून काढून टाकले आहेत. चेक पॉईंट रिसर्चच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे, अहवालात असे सांगण्यात आले आहे की, 3 संशोधकांनी हे ओळखले आहे की हॅकर्स अँटीव्हायरस Apps च्या नावाखाली शार्कबॉट अँड्रॉइड स्टीलर सॉफ्टवेअरचा वापर करतात. अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सचा पासवर्ड, बँक तपशील आणि इतर वैयक्तिक माहिती चोरणे.

हे Apps Google Play Store वरून 15 हजारांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहेत. चेक पॉईंटच्या अहवालानुसार, हा मालवेअर जिओफेन्सिंग फीचर आणि इव्हेशन टेक्नॉलॉजी वापरतो ज्यामुळे ते इतर मालवेअरपेक्षा वेगळे करण्यात मदत होते. इतकेच काय, ते डोमेन जनरेशन अल्गोरिदम वापरते जे यापूर्वी Android मालवेअरच्या जगात इतर कोणी वापरले नव्हते.

शार्कबॉट अँड्रॉइड मालवेअरच्या मदतीने, या 6 अँटीव्हायरस Apps ने 15 हजारांहून अधिक लोकांना आपला बळी बनवले आहे जे बँकिंग आणि क्रेडेन्शियल माहिती चोरतात. सर्वाधिक प्रभावित युजर्स हे इटली आणि यूकेचे आहेत.

'हे' 6 Apps आहेत धोकादायक

Atom Clean Booster, Antivirus
Antivirus Super Cleaner
Center Security Antivirus
Alpha Antivirus Cleaner
Powerful Cleaner Antivirus
Center Security Antivirus
 

Web Title: antivirus apps on google play store steal 15000 android smartphone users personal data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.