ऑनलाईन मागवले इयरबड्स परंतु मिळाला रिकामा डब्बा; ‘या’ अभिनेत्याने केली Flipkart कडे तक्रार 

By सिद्धेश जाधव | Published: October 16, 2021 05:47 PM2021-10-16T17:47:07+5:302021-10-16T17:49:10+5:30

Online Shopping Flipkart Fraud With Anupamaa Actor: Anupama TV Serial मधील अभिनेता Paras Kalnawat यांना Nothing इयरबड्सचा रिकामा बॉक्स Flipkart ने दिला आहे.  

Anupamaa actor paras kalnawat gets empty box from flipkart instead of nothing earphones worth rs 6000  | ऑनलाईन मागवले इयरबड्स परंतु मिळाला रिकामा डब्बा; ‘या’ अभिनेत्याने केली Flipkart कडे तक्रार 

(सौजन्य:Paras Kalnawat)

Next

कधीकधी ऑनलाईन फेस्टिव्हल सेलमधून खरेदी करणे ग्राहकांसाठी महागात पडू शकते. अशावेळी वेबसाईटवर जास्त लोक खरेदी करत असतात आणि त्यातून चुका तसेच फसवणूक होण्याची शक्यता देखील जास्त असते. अशी एक घटना Flipkart Sale मध्ये घडली आहे. या आठवड्यात फ्लिपकार्टच्या फसवणुकीची ही दुसरी बातमी आहे. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला iPhone 12 च्या बॉक्समध्ये साबणाच्या वाध्य मिळाल्या होत्या. तर यावेळी Anupama TV Serial मधील अभिनेता Paras Kalnawat यांना इयरबड्सचा रिकामा बॉक्स देण्यात आला आहे.  

विशेष म्हणजे पारस यांनी Nothing ब्रँडचे ईयरफोन (Nothing Ear 1 TWS) फ्लिपकार्टवरून ऑर्डर केले होते. त्यानंतर जेव्हा त्यांना ऑर्डर मिळाली तेव्हा Nothing ईयरफोनच्या बॉक्समध्ये काहीच मिळाले नाही. या घटनेची माहिती पारस यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी Nothing कंपनी आणि ई-कॉमर्स साईट Flipkart ला टॅग केले आहे.  

नेमकं प्रकरण काय आहे  

पारस कलनावत यांनी ट्विटरवरून या घडलेल्या प्रकारची माहिती दिली आहे. यासाठी एक ट्विट करून त्यांनी Nothing Ear (1) च्या रिकाम्या बॉक्सचा फोटो शेयर केला आहे. तसेच त्यांनी म्हटले आहे कि, “मला Nothing च्या बॉक्समध्ये काहीच मिळाले नाही, जो मी Flipkart वरून विकत घेतला होता. फ्लिपकार्टचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे,काही लोक फ्लिपकार्टवरून शॉपिंग करणे आता बंद करत आहेत.” 

या ट्विटनंतर लगेचच ई-कॉमर्स कंपनी Flipkart सपोर्ट ट्विटर हॅन्डलवरून अभिनेत्याची माफी मागण्यात आली. तसेच ऑर्डर आयडीसह इतर माहिती मागवण्यात आली. फ्लिपकार्टच्या या  ट्विटवर पारस यांनी अजूनतरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.  

Web Title: Anupamaa actor paras kalnawat gets empty box from flipkart instead of nothing earphones worth rs 6000 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.