काय सांगता? तब्बल 12 कोटींना विकला जाणार अ‍ॅपलचा दुर्मिळ संगणक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 01:59 PM2019-10-27T13:59:46+5:302019-10-27T14:01:38+5:30

अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेला दुर्मिळ संगणक Apple-1 विक्रीसाठी उपलब्ध आहे.

apple 1 computer up for sale on ebay at a whopping price of 1 75 million dollars | काय सांगता? तब्बल 12 कोटींना विकला जाणार अ‍ॅपलचा दुर्मिळ संगणक

काय सांगता? तब्बल 12 कोटींना विकला जाणार अ‍ॅपलचा दुर्मिळ संगणक

Next
ठळक मुद्देअ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेला दुर्मिळ संगणक Apple-1 विक्रीसाठी उपलब्ध आहे. अ‍ॅपल 1 संगणक  ई-कॉमर्स वेबसाईट eBay वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. किंमत ही तब्बल 1.75 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 12.3 कोटी रुपये आहे.

नवी दिल्ली - अ‍ॅपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी तयार केलेला दुर्मिळ संगणक Apple-1 विक्रीसाठी उपलब्ध आहे. 9टू5 मॅकने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, अ‍ॅपल 1 संगणक  ई-कॉमर्स वेबसाईट eBay वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. याची किंमत ही तब्बल 1.75 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 12.3 कोटी रुपये आहे. वूडन केसिंगमध्ये हा संगणक आहे. जगभरात असे एकूण सहा संगणक आहेत. अ‍ॅपल 1 हा संगणक स्टीव्ह जॉब्स आणि सह-संस्थापक स्टीव्ह व्होजनिएक यांनी तयार केला आहे.

संगणकाच्या मालकासंबंधी या रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली आहे. 1978 पासून त्यांच्याकडे हा संगणक असून तो अजूनही चांगल्या स्थितीत आहे. कोट्यवधी रुपये किंमत असलेला हा पहिला संगणक नाही. याआधी 2016 मध्ये अ‍ॅपल 1 चे प्री-प्रॉडक्शन मॉडल विक्रीसाठी उपलब्ध होते. तो 815,000 डॉलरला विकला गेला होता. अ‍ॅपल 1 मध्ये एक मॉनिटर आणि एक कस्टमाइज्ड वुडेन केस आहे. तसेच यामध्ये ओरिजिनल ओनल मॅन्युअलची डिजिटल कॉपी, बेसिक मॅन्युअल, स्कीमॅटिक्स, कसेट इंटरफेस आणि गाइड्ससह बेसिक गेम्स, लँग्वेज, लो अँड हाय मेमरी टेस्ट, 30 व्या वर्धापनदिनाच्या व्हिडिओसहीत त्यात आणखी फीचर्स आहेत. 

संगणकाच्या मालकांना दिलेल्या माहितीनुसार, 'हा संगणक दुर्मिळ आहे. या प्रकारचे केवळ सहा संगणक उपलब्ध आहेत. ऑरिडनल Byte Shop KOA वूड केससह तो उपलब्ध आहे. आता हे संगणक म्युझिअममध्ये पाहायला मिळतात.' अ‍ॅपलचा हा संगणक 11 एप्रिल 1976  रोजी लाँच झाला होता. अ‍ॅपल 1 ची मेमरी 4 केबी असून ती कार्डच्या मदतीने 8 केबी किंवा 48 केबीपर्यंत वाढवता येते. 10 जून 1977  रोजी अ‍ॅपल 2 च्या निर्मितीनंतर 30 सप्टेंबर 1977 रोजी कंपनीने अ‍ॅपल 1 ची निर्मिती बंद केली होती. हा संगणक ईबेवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Apple iPhone युजर्स आता इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर यूज करू शकणार आहेत. इन्स्टाग्रामवर या फीचरची अनेक दिवसांपासून टेस्टिंग सुरू होती. त्यानंतर आता कंपनीने हे रोलआऊट करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जगभरातील आयफोन युजर्सना इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचरचा आनंद घेता येणार आहे. अँड्रॉईड स्मार्टफोनसाठी आधीपासून इन्स्टाग्रामवर डार्क मोड फीचर उपलब्ध आहे. आयफोन युजर्स हँडसेटच्या सिस्टमवरून डार्क मोड फीचर ऑन करून इन्स्टाग्रामचा लूक बदलू शकतात. अ‍ॅपलच्या लेटेस्ट  iOS 13 मध्ये ही हे देण्यात आले आहे. इन्स्टाग्रामवर बॅकग्राऊंड व्हाईटवरून ब्लॅक आणि डार्क ग्रे रंगाचा होतं. आयफोन युजर्सना इन्स्टाग्राम डायरेक्ट मेसेज स्क्रिनवर ब्लॅक आणि ग्रे कॉम्बिनेशन दिसणार आहे. तसेच एडिट प्रोफाईल, प्रमोशन आणि बटण ब्लॅक असणार आहेत. 

 

Web Title: apple 1 computer up for sale on ebay at a whopping price of 1 75 million dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.