सावधान! कार चोरी करण्यासाठी चोर वापरतायत Apple AirTag; अशाप्रकारे राहा सुरक्षित
By सिद्धेश जाधव | Published: December 6, 2021 07:54 PM2021-12-06T19:54:20+5:302021-12-06T19:55:57+5:30
Apple AirTag च्या टेक्नॉलॉजीचा वापर कार चोरण्यासाठी चोर करत आहेत. या पद्धतीचा वापर करून चोर सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या लग्झरी कार्स चोरत आहेत.
Apple AirTag चा वापर युजर्सच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी केला जातो. परंतु प्रत्येक चांगल्या टेक्नॉलॉजी जसा दुरुपयोग केला जातो, तसे एयरटॅग देखील वापरले जात आहेत. काही गुन्हेगार या ट्रॅकिंग टूलचा वापर करून गाड्या चोरत आहेत. अशा घटना कॅनडामधील यॉर्क भागातून समोर आल्या आहेत. चला जाणून घेऊया अॅप्पल एयरटॅगच्या ट्रॅकिंग फीचरचा वापर करून चोर कशाप्रकारे गाड्या लंपास करत आहेत आणि तुम्ही यापासून कसं सुरक्षित राहू शकता.
अशाप्रकारे होते Apple AirTag च्या मदतीने चोरी
Apple AirTag चा वापर करून कशाप्रकारे गाड्यांची चोरी केली जाते, याची माहिती यॉर्क भागातील ऑटो आणि कार्गो थेफ्ट युनिटनं दिली आहे. गुन्हेगार मॉल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कार्सना लक्ष्य करतात. त्यानंतर आपल्याकडील त्या कारवर Apple AirTag अशा ठिकाणी लावतात, जिथे मालकीची नजर जात नाही.
त्यानंतर तो एयरटॅग ट्रॅक केला जातो. या ट्रॅकिंगमधून मालकाच्या घरचा पत्ता मिळवला जातो आणि घराच्या समोरून गाडी चोरली जाते. गाडीत प्रवेश करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातो, तर ऑनबोर्ड डायग्नोस्टिक पोर्टच्या मदतीनं गाडी हॅक करून स्टार्ट केली जाते. यात अॅप्पल एयरटॅग फक्त कर मालकाचा पत्ता शोधण्यासाठी केला जातो.
असं राहा सुरक्षित
यॉर्क पोलिसांनी अशाप्रकारच्या चोरीपासून वाचण्याची पद्धत देखील सांगितली आहे. त्यानुसार, गाडी बंदिस्थ जागी उभी करावी, स्टीयरिंग लॉकचा वापर करावा, सिक्योरिटी कॅमेऱ्यांचा वापर करावा आणि अपने गाडीची वेळोवेळी झडती घ्यावी. तसेच जेव्हा तुम्ही अनोळखी अॅप्पल एयरटॅगच्या कक्षेत येत तेव्हा अॅप्पल तुमच्या आयफोनवर अलर्ट पाठवतो. अलर्टच्या मदतीने तुम्ही स्वतःची आणि कारची ट्रॅकिंग टाळू शकता.