भारतीय फोटोग्राफरच्या फोटोने जिंकले अॅप्पलच्या सीईओंचे मन...केले ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:15 PM2019-08-20T16:15:13+5:302019-08-20T16:25:03+5:30
टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे.
सॅन फ्रान्सिस्को : अॅप्पलचे सीईओ टीम कुक यांनी भारतीय फोटोग्राफरने काढलेला एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोचे त्यांनी कौतुकही केले आहे. वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने त्यांनी आयफोनमधून काढलेले पाच फोटो ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत. यामध्ये भारतीय फोटोग्राफर वरूण आदित्य याचाही फोटो आहे.
टीम कुक यांनी वरुणच्या या फोटोला सुंदर ओळही दिली आहे. मुळचे भारतीय असलेल्या आदित्य हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. त्यांचे फोटो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनाला ठेवले जातात. कुक यांनी एक फोटो ट्विटरवर टाकत म्हटले आहे की, आम्हाला दर रोज आमच्या ग्राहकांकडून आयफोनवर काढलेल्या फोटोंमुळे प्रेरणा मिळते. हे फोटो पाहून आनंदही होतो. आदित्य यांनी केनियाच्या एंबोसेलीमध्ये हत्तींसोबत इंद्रधनुष्याचा सुंदर फोटो काढला आहे.
“Double Rainbow adorned by elephants in the beautiful Savannah at Amboseli, Kenya.” #shotoniPhone by Varun Aditya (IG: varun.aditya) #WorldPhotographyDaypic.twitter.com/dq0iv6idLb
— Tim Cook (@tim_cook) August 19, 2019
कुक यांनी आणखी एक ट्विट करत सांगितले की, जगभातील आपल्या आवडीच्या फोटोंवरून एक नजर टाका.
आयफोन फोटोग्राफी अॅवॉर्ड
दरम्यान, आयफोन फोटोग्राफी अॅवॉर्ड (IPPAWARDS) 2019 मध्ये दोन स्वतंत्र फोटोग्राफरना बक्षिस देण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राची डिंपी भलोटिया हिला सिरीज कॅटेगरीमध्ये द्वितीय स्थान आणि सनसेट कॅटेगरिमध्ये कर्नाटकच्या श्रीकुमार कृष्णन यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षिस मिळाले आहे.
Tulips on a foggy spring morning in the Netherlands #shotoniPhone by Patrick Smit (IG: GroovyPat). Mesmerizing fabric and water by Maria Jose Govea (IG: thesupermaniak). pic.twitter.com/hPG6ovut9g
— Tim Cook (@tim_cook) August 19, 2019
“On a recent summer road trip with my family we stopped to play on these hay bales. I caught a photo of my daughter airborne with her pigtails flying into the sky.” #shotoniPhone by Todd Lawson (IG: ToddLawsonPhoto) pic.twitter.com/6sTDX3gPw2
— Tim Cook (@tim_cook) August 19, 2019
Stunning photo of the Dolomites by Carolin Steig (IG: WeTravelTheWorld) and a captivating moment on a Baku beach by Mikhail Zatulivetrov (IG: iamzatulivetrov) pic.twitter.com/yq5cRy4a4L
— Tim Cook (@tim_cook) August 19, 2019
Check this out---valuable #shotoniPhone tips from Gess! #WorldPhotographyDayhttps://t.co/mvMj98a1Ie
— Tim Cook (@tim_cook) August 20, 2019