Apple कंपनीने १८५ तेलगू कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढले; टीका होताच..., कोणीच समर्थन करू शकले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 12:48 IST2025-01-06T12:47:00+5:302025-01-06T12:48:06+5:30
अॅप्पलसारख्या कंपनीत नोकरी करण्याची संधी मिळविण्यासाठी करोडो लोक तरसत असतात. पण ज्यांना नोकरी मिळाली ते ती टिकवू शकत नाहीत, इमाने इतबारे करू शकत नाहीत.

Apple कंपनीने १८५ तेलगू कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीवरून काढले; टीका होताच..., कोणीच समर्थन करू शकले नाही
जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅप्पल कंपनीने १८५ भारतीय कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यामुळे कंपनीवर टीका होत होती. यावर कंपनीने या कर्मचाऱ्यांना का काढून टाकले त्याचे कारण दिले आहे. अॅप्पलने तेलगू भाषिक असलेल्या या कर्मचाऱ्यांना काढले आहे.
तेलगू कर्मचाऱ्यांनाच नोकरीवरून काढल्याने भाषिक वाद किंवा भारतीय असल्याचा आकस आदी गोष्टींवरून कंपनीवर सोशल मीडियातून टीका करण्यात येत आहे. परंतू, हा वाद नसून या कर्मचाऱ्यांनी कंपनीसोबत फ्रॉड केला आहे, तसेच कर चोरी केली आहे. या कारणामुळे अमेरिकेच्या आयकर विभागाने कंपनीला या कर्मचाऱ्यांबाबत सूचित केले होते. यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
अॅप्पल एक खास योजना राबविते, जिचे नाव Apple Matching Gifts Program असे आहे. याचा या तेलगू कर्मचाऱ्यांनी गैरवापर केला होता. अमेरिकेच्या आयएरएसने याचा भांडाफोड केला आहे. तेलगू भाषिक लोकांनी एकमेकांना सांगून याचा गैरफायदा उठविला होता. यामुळे त्यांना नोकरी गमवावी लागली आहे.
काही कर्मचारी अनियमितता करून अॅप्पलच्या गिफ्ट प्रोग्रॅमचा लाभ उठवत असल्याचा संशय अॅप्पलच्या फायनान्स विभागाला आला होता. त्यांनी आयआरएसला याबाबत कळविले होते. यात आयआरएसने १८५ कर्मचाऱ्यांचे आयकर रिटर्न तपासले तर यात गडबड केल्याचे समोर आले. या १८५ तेलगू कर्मचाऱ्यांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापकांपासून एंट्री लेव्हल एक्झिक्युटिव्हपर्यंत सर्वांचा समावेश होता.