आयफोन्स विकत घेण्याची सुवर्णसंधी; कंपनीने कमी केल्या जुन्या मॉडेल्सच्या किंमती
By सिद्धेश जाधव | Published: September 15, 2021 11:34 AM2021-09-15T11:34:57+5:302021-09-15T11:35:22+5:30
Apple iPhone price cut: नवीन सीरिज सादर केल्यामुळे कंपनीने जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
Apple ने काल झालेल्या आपल्या लाँच इव्हेंटच्या माध्यमातून आपली iPhone 13 सीरिज सादर केली आहे. या नव्या सीरिजमध्ये कंपनीने चार मॉडेल सादर केले आहेत. यात iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max असे मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. नवीन सीरिज सादर केल्यामुळे कंपनीने जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
54,000 रुपयांमध्ये उपलब्ध झालेला iPhone 11 (64GB) आता 49,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीने या फोनच्या किंमतीती 5,000 रुपयांची कपात केली आहे. तसेच iPhone 12 च्या किंमतीत 14,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे या सीरिजमधील बेस व्हेरिएंट 79,900 रुपयांच्या ऐवजी 65,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लोकप्रिय iPhone 12 mini देखील 10,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पुढे आम्ही जुन्या आयफोन मॉडेल्सच्या नव्या किंमतींची यादी दिली आहे.
iPhone मॉडेल | जुनी किंमत (रुपये) | प्राईस कट | नवीन किंमत ( रुपये) |
---|---|---|---|
Apple iPhone 11 (64GB) | 54,900 | 5,000 | 49,900 |
Apple iPhone 11 (128GB) | 59,900 | 5,000 | 54,900 |
Apple iPhone 12 mini (64GB) | 69,900 | 10,000 | 59,900 |
Apple iPhone 12 mini (128GB) | 74,900 | 10,000 | 64,900 |
Apple iPhone 12 mini (256GB) | 84,900 | 10,000 | 74,900 |
Apple iPhone 12 (64GB) | 79,900 | 14,000 | 65,900 |
Apple iPhone 12 (128GB) | 84,900 | 14,000 | 70,900 |
Apple iPhone 12 (256GB) | 94,900 | 14,000 | 80,900 |