असं करू नका! 21 वर्षानंतर Apple चं लोकप्रिय प्रोडक्ट बंद झाल्यावर युजर्स भावुक
By सिद्धेश जाधव | Published: May 11, 2022 01:24 PM2022-05-11T13:24:48+5:302022-05-11T13:24:56+5:30
Apple ने आपली iPod लाईनअप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता यांची जागा होम पॉड मिनी, आयफोन आणि अॅप्पल वॉच घेतील.
Apple नं अधिकृतपणे म्यूजिक प्लेयर iPod Touch बंद केला आहे, जो आयपॉड लाईनअपचा शेवटचा मॉडेल आहे. जो पर्यंत स्टॉक संपत नाही तोपर्यंत हा डिवाइस विकत घेता येईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. आपल्या आवडत्या iPod ला निरोप देताना युजर्स भावुक झाले आहेत. सोशल मीडियावरून असं न करण्याची विनंती देखील अनेकांनी अॅप्पलला केली आहे.
Apple iPod चा पहिला मॉडेल 2001 ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आला होता. त्यानंतर आलेले अनेक मॉडेल्स कंपनीनं एक-एक करून बंद केले आहेत. ज्यात iPod Classic, iPod nano आणि iPod shuffle इत्यादींचा समावेश आहे. 2019 मध्ये आलेला 7th Gen iPod Touch या लाईनअपमधील शेवटचा आयपॉड ठरला आहे. ज्यात आयफोन 7 मधील A10 Fusion चिप आणि 4 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला होता.
after 21 years, apple discontinued the ipod 😭 so long and goodnight 🖤 pic.twitter.com/xbWvPf2GMh
— When We Were Young (@WWWYFest) May 10, 2022
apple has officially discontinued the iPod.. the end of an era. pic.twitter.com/4ZAL3tCFaG
— 2000s (@PopCulture2000s) May 10, 2022
आता मिळणार नाहीत iPod
iPod ची विक्री बंद करण्याचा निर्णय कंपनीनं घेतला आहे. स्मार्टफोन्सवरच म्यूजिक, व्हिडीओ, गेमिंग आणि अन्य अनेक सुविधा मिळत आहेत. त्यामुळे वेगळा डिवाइस विकत घेण्याचा विचार देखील ग्राहक करत नाहीत. अॅप्पल आयपॉड बंद करणार हे निश्चित वाटत होतं परंतु इतका वेळ घेतला जाईल, हे अपेक्षित नव्हतं. कंपनीने iPod touch मध्ये अपडेट्स देणं काही वर्षांपूर्वीच बंद केलं होतं. विक्री देखील घटली होती.
स्टॉक संपेपर्यंत iPod Touch बाजारात उपलब्ध होईल, असं कंपनीनं सांगितलं आहे. म्यूजिक प्रेमींसाठी iPhones, Apple Watch आणि HomePod mini इत्यादी प्रोडक्ट्स अॅप्पलनं सुचवले आहेत.