Apple Event 2020: अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:01 AM2020-09-16T00:01:34+5:302020-09-16T07:47:43+5:30

Apple Event 2020 : आयपॅड एअरची बुकिंग आजपासून सुरु झाली असून विक्री येत्या शुक्रवारपासून होणार आहे.

Apple Event 2020 : Apple launches new iPad Air, see specialty | Apple Event 2020: अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च, जाणून घ्या खासियत

Apple Event 2020: अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च, जाणून घ्या खासियत

Next
ठळक मुद्देनवीन आयपॅड एअरमध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे

अॅपल कंपनीने एका आयोजित कार्यक्रमात आपल्या नवीन प्रोडक्टचे लाँन्चिंग केले आहे. कोरोना संकट काळात या नवीन प्रोडक्टचे लाँन्चिंग ऑनलाइन करण्यात आले. यावेळी अ‍ॅपलने नवीन आयपॅड एअर, आयपॅड आणि अ‍ॅपल वॉच सीरिज लॉन्च केली आहे.

नवीन आयपॅड एअरची (iPad Air) सुरुवातीची किंमत ३२९ डॉलर इतकी आहे. मात्र, विद्यार्थ्यांसाठी हा २९९ डॉलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आयपॅड एअरची बुकिंग आजपासून सुरु झाली असून विक्री येत्या शुक्रवारपासून होणार आहे. आयपॅड एअरला A14 Bionic च्या आधारे जारी करण्यात आले आहे. यामध्ये टच आयडी फिंगर प्रिंट सेंसरची सुविधा देण्यात आली आहे.

याचबरोबर, या नवीन आयपॅड एअरमध्ये ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा रिअप कॅमेरा देण्यात आला आहे. 
याशिवाय, यामध्ये 4K 60p व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि स्टिरिओ स्पीकर्सची सुद्धा सुविधा आहे. तसेच, पाच व्हायब्रंट कलरमध्ये हा आयपॅड एअर असणार आहे.  या आयपॅड एअरमध्ये मॅजिक कीबोर्डचा सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये चांगला LTE सपोर्ट मिळणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

आयपॅड एअर भारतात ऑक्टोबरमध्ये उपलब्ध होईल. आयपॅड एअरच्या वायफाय मॉडेलची किंमत 54 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर वाय-फाय प्लस सेल्युलर मॉडेलची किंमत 66 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. 64 जीबी आणि 256 जीबी अशा दोन पर्यायांमध्ये आयपॅड एअर उपलब्ध असणार आहे.
 

Web Title: Apple Event 2020 : Apple launches new iPad Air, see specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल