Apple Event 2020 : बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच न झाल्याने 'नाराजी'चा सूर, ट्विटरवर आला भन्नाट रिअ‍ॅक्शनचा पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 08:57 AM2020-09-16T08:57:47+5:302020-09-16T09:05:52+5:30

Apple Event 2020 : यंदा  Apple ने आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 12 चं लॉन्चिंग थांबवलं आहे. 

apple event 2020 iphone 12 not launched people disappointed reactions on twitter | Apple Event 2020 : बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच न झाल्याने 'नाराजी'चा सूर, ट्विटरवर आला भन्नाट रिअ‍ॅक्शनचा पूर

Apple Event 2020 : बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच न झाल्याने 'नाराजी'चा सूर, ट्विटरवर आला भन्नाट रिअ‍ॅक्शनचा पूर

googlenewsNext

अ‍ॅपलने आपल्या खास कार्यक्रमामध्ये दमदार आणि जबरदस्त फीचर्स असलेली काही उत्पादने लाँच केली आहेत. कोरोना संकट असल्याने हा संपूर्ण सोहळा ऑनलाईन संपन्न झाला आहे. या कार्यक्रमात Apple Watch Series 6 आणि Apple Watch SE लाँच करण्यात आली आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी पेन्सिल आणि रेटीना डिस्प्ले असलेले Apple iPad Air देखील लाँच केलं आहे. मात्र यंदा  Apple ने आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 12 चं लॉन्चिंग थांबवलं आहे. 

iPhone 12 लाँच न झाल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अनेक जण निराश झाले असून सोशल मीडियावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लोक iPhone 12 ची आतुरतेने वाट पाहत होते. या कार्यक्रमात तो लाँच केला जाईल अशी सर्वांना आशा होती. अ‍ॅपलने आपल्या कार्यक्रमात काही दमदार उत्पादन लाँच केली पण iPhone 12 लाँच न केल्याने ट्विटरवर भन्नाट प्रतिक्रियांचा पूर आला आहे. यावरून अनेक मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. 

Apple दरवर्षी आपला नवा iPhone बाजारात लाँच करतो. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या या महामारीचा फटाका अ‍ॅपलला देखील बसू शकतो. त्यामुळेच अ‍ॅपलने यंदा आपला बहुप्रतिक्षित  iPhone 12 लाँच केला नसल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अ‍ॅपलकडून नवीन आयपॅड लाँच करण्यात आलं असून विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 299 डॉलरमध्ये मिळणार आहे. 

अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच

अ‍ॅपलने दोन नवीन अ‍ॅपल वॉच लाँच केले आहेत. अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लाँच करण्यात आली आहे. कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे. यासोबतच ईसीजी, हार्ट रेट आणि अन्य सेन्सर देखील असणार असून ते अ‍ॅपल वॉच सीरिज 5 आणि सीरिज 4 सोबत असणार आहेत. कोरोनाच्या या संकटात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तातील ऑक्सिजन अवघ्या 15 सेकंदांत मोजण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. त्यामुळेच अशाप्रकारचं वॉच हे अत्यंत उपयुक्त मानलं जात आहे. 

अ‍ॅपलच्या सीरिजमध्ये नवीन वॉच फेस 

अ‍ॅपल वॉच सीरिज 6 मध्ये एलिवेशन ट्रेकिंग देण्यात आले आहे. एलिवेशन ट्रेकिंगमुळे युजरला तो किती उंचीवर आहे याची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अ‍ॅपलच्या या सीरिजमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. जे युजर्स त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकतात. या सीरिजची किंमत 399 अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. भारतात Apple Watch 6 Series (GPS) ची किंमत 40 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर Apple Watch Series 6 (GPS Cellular) 49 हजार 900 रुपयांनी सुरू होईल. 



महत्त्वाच्या बातम्या

Apple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच

Apple Event 2020 LIVE Updates: अ‍ॅपलकडून नवीन आयपॅड लॉन्च; विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत

Apple Event 2020: अ‍ॅपलचा नवीन iPad Air लॉन्च, जाणून घ्या खासियत

Apple Event 2020: अ‍ॅपलकडून नवीन वॉच सीरिज, आयपॅड लॉन्च; जाणून घ्या किमती अन् वैशिष्ट्यं

Web Title: apple event 2020 iphone 12 not launched people disappointed reactions on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.