Apple Event 2023 : एकदम भन्नाट! Apple चे पहिलेवहिले १००% कार्बन न्यूट्रल वॅाच लाँच, आता Siri देणार हेल्थ डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:20 PM2023-09-12T23:20:55+5:302023-09-12T23:21:38+5:30

मंगळवारी अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान कंपनीनं आपली अ‍ॅपल वॉच सीरिज ९ लाँच केली.

Apple Event 2023 The wait is over Apple Watch Series 9 launched now Siri will provide health data check details | Apple Event 2023 : एकदम भन्नाट! Apple चे पहिलेवहिले १००% कार्बन न्यूट्रल वॅाच लाँच, आता Siri देणार हेल्थ डेटा

Apple Event 2023 : एकदम भन्नाट! Apple चे पहिलेवहिले १००% कार्बन न्यूट्रल वॅाच लाँच, आता Siri देणार हेल्थ डेटा

googlenewsNext

जगभरातील अनेक लोकांची नजर अ‍ॅपलच्या इव्हेंटवर असते. विशेषकरून अ‍ॅपलचे फॅन्स यावर लक्ष ठेवून असतात. मंगळवारी अ‍ॅपल इव्हेंटदरम्यान कंपनीनं आपली अ‍ॅपल वॉच सीरिज ९ लाँच केली. टीम कुक यांनी अ‍ॅपल इव्हेंटची सुरूवात करत हे इव्हेंट केवळ आयफोन आणि अ‍ॅपल वॉचवरच असेल असं स्पष्ट केलं. यासोबतच त्यांनी यापूर्वीच्या इव्हेंटमध्ये लाँच केलेल्या मॅकबुक आणि अन्य मॅक प्रोडक्ट्सच्या बाबतीत माहिती देत अ‍ॅपल व्हिजन प्रोबाबतही माहिती दिली.

अ‍ॅपलनं इव्हेंटची सुरुवात करतानाच Apple Watch 9 ची घोषणा केली. यामध्ये युझर्सना S9 चिप पाहायला मिळणार आहे. तसंच अ‍ॅपल वॉच वापरून सिरीच्या (Siri) मदतीनं हेल्थ डेटाही मागता येणार आहे. सुरुवातीला हे फीचर केवळ इंग्रजी आणि मंडारियनमध्ये उपलब्ध असेल. यासोबतच सीरिज ९ मध्ये यापूर्वीच्या तुलनेत उत्तम डिस्प्ले देण्यात आलाय. याशिवाय नव्या फीचरच्या मदतीनं तुम्ही सहजरित्या आयफोनही शोधू शकणार आहात.

नवं फीचर
अ‍ॅपल वॉच सीरिज ९ मध्ये कंपनीनं नवं फीचर दिलं आहे. आता एकाच हाताच्या मदतीनं तुम्हाला अ‍ॅपल वॉच वापरता येईल. तुम्ही ज्या हातात घड्याळ घातलंय, त्याच हाताचं इंडेक्स फिंगर आणि अंगठ्यानं डबल टॅप करून अनेक फीचर्स कंट्रोल करता येणार आहेत. कंपनीनं या फीचरला डबल टॅप नाव दिलंय. अ‍ॅपल वॉच पाच रंगांमध्ये उपलब्ध होईल.

अ‍ॅपलच्या उत्पादनांत शून्य कार्बन उत्सर्जनाची संकल्पना अंगीकारण्यात आली असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. २०३० पर्यंत, कंपनीची सर्व उत्पादनं नेट झिरो इम्पॅक्ट ऑन नेचरचा भाग असतील. म्हणजे कंपनी कार्बन न्यूट्रल होईल. यावेळी अ‍ॅपलनं आपल्या पोर्टफोलिओमध्ये अनेक नवीन बँड जोडले आहेच. यासाठी कंपनीनं Nike आणि इतर कंपन्यांशी कोलॅब केलंय.

Apple Watch Ultra 2 लाँच
कंपनीने गेल्या वर्षी Apple Watch Ultra लाँच केलं होतं. यावेळी याचं नेक्स्ट जनरेशन लाँच करण्यात आलंय. यामध्ये तुम्हाला मोठी स्क्रीन आणि वॉच ९ चे सर्व फीचर्स मिळतील. यावर तुम्हाला मॉड्युलर अल्ट्रा नावाचा एक एक्सक्लुझिव्ह वॉच फेस मिळेल, जो दिवसा आणि रात्रीच्या वेळी अशा दोन्ही परिस्थितीत वेगळ्या पद्धतीने काम करेल.

किती असेल किंमत
कंपनीनं Apple Watch SE च्या नव्या मॉडेलची सुरुवातीची किंमत २४९ डॉलर्स निश्चित केली आहे. तर Apple Watch Series 9 साठी ३९९ डॉलर्स आणि Apple Watch Ultra 2 साठी ७९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. यासाठी आजपासून प्री बुकिंगही सुरू करण्यात आलंय.

Web Title: Apple Event 2023 The wait is over Apple Watch Series 9 launched now Siri will provide health data check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल