Apple Event LIVE: जगातील सर्वात शक्तीशाली प्रोसेसर! अ‍ॅपलकडून होम पॅड मिनी, एयरपॉड्स, MacBook Pro लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:21 PM2021-10-18T23:21:11+5:302021-10-18T23:35:43+5:30

Apple Event launching: अ‍ॅपलने (Apple) आपल्या इव्हेंटमध्ये एकसो एक उत्पादने लाँच केली आहे. टीम कुक यांनी इव्हेंटची सुरुवात केली. यावेळी त्यांनी या नव्या उत्पादनांची माहिती दिली.

Apple Event LIVE: Apple launches Home Pad Mini, AirPods, MacBook Pro; see price and specification | Apple Event LIVE: जगातील सर्वात शक्तीशाली प्रोसेसर! अ‍ॅपलकडून होम पॅड मिनी, एयरपॉड्स, MacBook Pro लाँच

Apple Event LIVE: जगातील सर्वात शक्तीशाली प्रोसेसर! अ‍ॅपलकडून होम पॅड मिनी, एयरपॉड्स, MacBook Pro लाँच

Next

अ‍ॅपलने (Apple) आपल्या इव्हेंटमध्ये एकसो एक उत्पादने लाँच केली आहे. टीम कुक यांनी इव्हेंटची सुरुवात केली. यावेळी त्यांनी या नव्या उत्पादनांची माहिती दिली. याचबरोबर कंपनीने अ‍ॅपल म्युझिक व्हॉईस सबस्क्रीप्शन सर्व्हिसची घोषणा केली आहे. Siri द्वारे हे वापरता येणार आहे. 

अ‍ॅपलने यलो, ऑरेंज आणि ब्ल्यू रंगात HomePod Mini लाँच केले आहे. याचबरोबर कंपनीने नव्या डिझाईनचे AirPods लाँच केले. कंपनीने दावा केलेला असला तरी देखील ते जुन्या AirPods सारखेच दिसत आहेत. यामध्ये आधीपेक्षा जास्त चांगले ड्रायव्हर्स दिले असून ते स्वेट रेझिस्टंट देखील आहेत. AirPods Pro ची बॅटरी 6 तासांचा बॅकअप देईल. तसेच 5 मिनिटांत चार्ज करून हे एअर पॉड्स 1 तास चालू शकणार आहेत. याची किंमत 179 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. कंपनीचे अशाप्रकारे आता चार AirPods झाले आहेत.

MacBook Pro लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये कंपनीने प्रो चिप तयार केली असून ती देण्यात आली आहे. या चिपचे नाव M1 Pro ठेवण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की, M1 चिपसेटच्या तुलनेत M1 Pro चिप 70% टक्के फास्ट आहे. कंपनी आता इंटेलऐवजी स्वत:चा प्रोसेसर देण्यास सुरुवात केली आहे. M1 Max हा कंपनीने बनविलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा चिपसेट आहे. ही चिपसेट M1 Pro पेक्षा फास्ट असेल.

कंपनीने याला जगातील सर्वात शक्तीशाली नोटबुक चिपसेट म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे MacBook Pro 17 ते 21 तासांचा बॅटरी बॅकअप देतो. तसेच 30 मिनिटांत 50 टक्के बॅटरी चार्ज होते. 14 इंचाच्या MacBook Pro ची किंमत 1999 डॉलर, 16 इंच स्कीनच्या लॅपटॉपची किंमत 2499 डॉलर ठेवण्यात आली आहे.

Web Title: Apple Event LIVE: Apple launches Home Pad Mini, AirPods, MacBook Pro; see price and specification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल