बाबो! iPhone सोबत चार्जर न देणं Apple ला पडलं चांगलंच महागात; तब्बल 14 कोटींचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 03:38 PM2021-03-22T15:38:34+5:302021-03-22T15:41:01+5:30
Apple iPhone : आयओएस अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अॅपलने या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही असंही प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे.
जगातील दिग्गज फोन मेकर कंपनी अॅपल (Apple) ला आपल्या आयफोन 12 सीरीजच्या फोनची चार्जरशिवाय विक्री करणं चांगलंच महागात पडलं आहे. 9to5Google च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलमधील ग्राहक संरक्षण संस्था Procon-SP ने अॅपलला 2 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 14 कोटींचा दंड ठोठावला आहे. अॅपल कंपनीने आयफोन-12 सह चार्जर न दिल्याने कंपनीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. अॅपलने हा निर्णय घेताना पर्यावरणाचा फायदा होणार आहे, असं म्हटलं. मात्र आता त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकलं नाही असं प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे.
अॅपलने हँडसेटसह चार्जर दिला नाही. तरीदेखील फोनची किंमत कमी का केली नाही, असा प्रश्नही प्रोकॉन- एसपीने उपस्थित केला. अॅपलने चार्जरशिवाय आणि चार्जरसह फोनची किंमत किती असेल याची माहिती दिली नाही. बॉक्समध्ये युजर्सना चार्जर न दिल्याने वातावरणाचा कसा आणि किती फायदा झाला असा प्रश्न प्रोकॉन-एसपीने विचारला. मात्र अॅपलने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. युजर्सनी आयओएस अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अॅपलने या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही असंही प्रोकॉन- एसपीने म्हटलं आहे.
ब्राझीलमध्ये ग्राहक संरक्षणाविषयी कठोर नियम आहेत. अॅपलने गेल्या वर्षी 'आयफोन 12' लाँच केला होता. नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही. तसंच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नसल्याचं कंपनीने म्हटलं होतं. ई-वेस्टच्या (इलेक्ट्रॉनिक कचरा) त्रासापासून पर्यावरणाला वाचवायचं आहे यासाठी असा निर्णय घेतला असल्याचं कंपनीने म्हटलं होतं. अॅपलच्या या निर्णयाचे अनुकरण सॅमसंग कंपनीदेखील करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गुगलने केला धक्कादायक खुलासा: कंपनीवर तब्बल 3600 कोटींचा खटलाhttps://t.co/VL4RN7Dyyk#Google#GoogleChrome#technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 15, 2021
Apple सुस्साट! 4G, 5G ला विसरा आता 6G येणार; कंपनी लवकरच सुरू करणार काम
अॅपलने (Apple) आपल्या नव्या उत्पादनांची सीरिज लाँच करत असतं. यानंतर आता अॅपल 6G वायरलेस तंत्रज्ञान विकसित करण्याची तयारी करत आहे. कंपनीने सध्याच पहिली 5G सपोर्ट असलेली iPhone सीरीज iPhone 12 च्या रुपात सुरू केली आहे. त्यानंतर आता कंपनी सहाव्या पिढीच्या सेल्युलर कनेक्टिव्हिटी म्हणजेच 6G वर काम सुरू करण्याची तयारी दर्शवl आहे. अॅपलने इंटेल प्रोसेसरला त्याच्या मॅकबुक मालिकेत बदलण्यासाठी स्वत: ची M1 चिप तयार केली आणि आता 6G विकसित करण्याची कंपनीची तयारी दर्शवली असून यामुळे अॅपल कोणावरही अवलंबून राहू निश्चित असल्याचं स्पष्ट होत आहे.
तंत्रज्ञानाच्या दिग्गज कंपनीने या आठवड्यात नेक्स्ट जनरेशन नेटवर्क तंत्रज्ञानासाठी वायरलेस सिस्टीम रिसर्च इंजिनिअर्स शोधणे सुरू केलं आहे. कंपनीने या नोकरीसाठी जाहिरात देखील दिली आहे. या सूचनेनुसार नोकरी सिलिकॉन व्हॅली आणि सॅन डिएगो येथील अॅपलच्या कार्यालयांसाठी आहेत. जिथे कंपनी वायरलेस तंत्रज्ञान आणि चिप डिझाइनवर काम करते. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने निवडलेले लोक रेडिओ अॅक्सेस नेटवर्कसाठी वायरलेस कम्युनिकेशन सिस्टमची पुढील पिढी डिझाइन आणि रिसर्च करणार आहेत.
भारीच! आता मोबाईलवर सरकारी योजना आणि होणाऱ्या लाभाची मिळणार झटपट माहितीhttps://t.co/5TuiVI2eaX#RationCard#OneNationOneRationCard#MeraRation#App#technology
— Lokmat (@MiLOKMAT) March 15, 2021