रक्त न घेता शुगर लेव्हल सांगणार घड्याळ; बऱ्याच प्रयत्नानंतर Apple ला आता मिळाले यश!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 02:28 PM2023-02-23T14:28:39+5:302023-02-23T14:29:26+5:30
Apple : Apple ला आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यश आले तर ग्लुकोज मॉनिटर्स डायबिटिजच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे.
नवी दिल्ली : अॅपल (Apple) मूनशॉट स्टाइल प्रोजेक्टवर काम करत आहे. हा प्रोजेक्ट स्टीव्ह जॉब्स यांच्या काळातील आहे. या अंतर्गत कंपनी नॉन-इनवेसिव्ह आणि कंन्टिन्यू ब्लड ग्लुकोज मॉनिटरिंगवर काम करत आहे. या प्रयत्नाचे उद्दिष्ट E5 डब करणे आहे. याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचे रक्त न काढता त्याच्या शरीरात ग्लुकोज किती आहे? हे कळू शकते. कंपनी लवकरच ग्लुकोज मॉनिटर्स बाजारात आणू शकते, असे सांगण्यात येत आहे.
Apple ला आपला प्रोजेक्ट पूर्ण करण्यात यश आले तर ग्लुकोज मॉनिटर्स डायबिटिजच्या रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. ग्लुकोज मॉनिटर्स हे Apple वॉचच्या मॉनिटरिंग सिस्टममध्ये जोडण्याचा कंपनीचा उद्देश आहे. यामुळे Apple वॉच जगभरातील लाखो डायबिटिज रुग्णांसाठी अत्यावश्यक डिव्हाइस बनणार आहे. सध्या कंपनी या फीचरवर काम करत आहे. हे पाऊल कंपनीसाठी बाजाराचे नवीन मार्ग उघडू शकते.
दरम्यान, प्रत्येक 10 पैकी 1 अमेरिकन व्यक्तीला डायबिटिज आहे आणि ते सामान्यतः रक्ताच्या नमुन्यासाठी त्वचेला टोचणाऱ्या डिव्हाइसवर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार, Apple सिलिकॉन फोटोनिक्स चिप टेक्नॉलॉजी आणि ऑप्टिकल अब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी नावाची मोजमाप प्रक्रिया वापरून एक वेगळा अप्रोच घेत आहे. ही सिस्टिम त्वचेखालील भागात विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशाचे उत्सर्जन करण्यासाठी लेसर वापरते. हे पेशींमधून इंटरस्टिशियल फ्लुइड बाहेर जाऊ देते. हे ग्लुकोजद्वारे अवशोषित केले जाऊ शकतात.
कंपनीचा सर्वात गुप्त प्रोजेक्ट
Apple च्या एक्सप्लोरेटरी डिझाईन ग्रुपमध्ये या प्रोजेक्टवर शेकडो इंजीनिअर काम करत आहेत. Apple च्या गुप्त प्रोजेक्टपैकी हा एक प्रोजेक्ट आहे. यामध्ये कंपनीच्या सेल्फ ड्रायव्हिंग कार प्रोजेक्टपेक्षा कमी लोकांचा समावेश आहे. क्युपर्टिनो स्थित Apple च्या प्रवक्त्याने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला.
शेकडो लोकांवर केली चाचणी
विशेष म्हणजे, Apple ने गेल्या दशकात शेकडो लोकांवर आपल्या ग्लुकोज टेक्नॉलॉजीची चाचणी केली आहे. यापैकी बहुतेक अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांना स्वत:ला डायबिटिज आहे की नाही हे माहित नाही. याशिवाय, कंपनीने प्री-डायबिटीज आणि टाइप 2 डायबिटिज असलेल्या लोकांवर काही चाचणी देखील केली आहे.
12 वर्षांपासून काम सुरू
Apple गेल्या 12 वर्षांपासून ग्लुकोज मॉनिटर्स बनवण्यासाठी काम करत आहे. या टेक्नॉलॉजीचा एक उद्देश प्री-डायबिटीजचा त्रास असलेल्या लोकांना सावध करणे हा देखील आहे. याच्या मदतीने लोक टाइप 2 डायबिटिजला वाढण्यापासून रोखू शकतात आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करू शकतात.